शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयपूरमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

By admin | Updated: November 18, 2016 05:22 IST

‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला.

मुंबई : ‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा सांघिक विजेतेपदावर कब्जा करताना महाराष्ट्राने या खेळातील आपले वर्चस्व स्पष्ट केले. ३ सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशी एकूण ५ पदकांची कमाई करुन महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद उंचावले. त्याचवेळी यजमान राजस्थान संघाने उपविजेतेपद पटकावले.सवाई मानसिंग स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मनिष राव - भूषण पोतणीस या कसलेल्या जोडीने अपेक्षित बाजी मारताना यजमान राजस्थानच्या भरत राज - प्रशांत यांचा ११-५, ११-७ असा धुव्वा उडवला. मनिष - भूषण यांच्या आक्रमक खेळापुढे यजमानांच्या जोडीचा काहीच निभाव लागला नाही.महिला दुहेरीमध्येही करिष्मा - ॠतुजा यांनी एकतर्फी बाजी मारताना महाराष्ट्राच्या पदरी आणखी एक सुवर्ण पदकाची भर टाकली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या करिष्मा - ॠतुजा यांनी राजस्थानच्या गरिमा - मधुलिका यांचा ११-२, ११-३ असा फडशा पाडला.त्याचवेळी, मिश्र दुहेरीमध्ये मात्र महाराष्ट्राच्या अतुल एडवर्ड - नताशा बेग या बलाढ्य जोडीला झुंजावे लागले. राजस्थानच्या अश्वनी - कविता यांनी तीन सेटपर्यंत झुंज देत महाराष्ट्राच्या जोडीला कडवी टक्कर दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा चांगला अनुभव असलेल्या अतुलने नताशासह मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना अश्वनी - कविता यांचे आव्हान ११-१, ५-११, ११-६ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)