शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय - राष्ट्रपतींकडून कौतुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:53 IST

स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.

मुंबई : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागातील हागणदारीमुक्तीबाबतच्या ‘संकल्पपूर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. राष्ट्रपती आणि राज्यपालांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व संबंधित घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याबाबत राष्ट्रपतींनी राज्याचे अभिनंदन केले.महाराष्ट्राची सुमारे ४९ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे अर्धा महाराष्ट्र आज हागणदारीमुक्त झाला आहे. स्वच्छतेसाठी काम करणे ही ख-या अर्थाने मानवतेची सेवा आहे, असेही ते म्हणाले.मानसिकता बदलण्याची गरजलोकांची मानसिकता, तसेच सवयी बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाने ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड इव्हिनिंग’ पथके स्थापन करून या कामाला पुढे नेले. राज्याने दोन वर्षांत ४० लाख शौचालयांची निर्मिती केली. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.राष्ट्रपतींचा पहिलाच मुंबई दौरापदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी पहिल्यांदाच एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. या वेळी तिन्ही सेनादलांच्या संयुक्त तुकडीने राष्ट्रपतींना सलामी दिली.मुंबईकरांचे कौतुकमुंबईत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईवासी नेहमीच आव्हानांचा सामना करीत पुढे जात असतात, या शब्दांत त्यांनी मुंबईकरांचे कौतुक केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद