शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

महाराष्ट्रात भरपाई आता अडीचपटच!

By admin | Updated: December 31, 2014 10:01 IST

केंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यात ग्रामीण भागात प्रचलित बाजारभावाच्या चारपट भरपाई देण्याची तरतूद कायम ठेवली

भूसंपादन वटहुकूम : शिफारशीपेक्षा दीडपट कमी, प्रकल्पग्रस्तांना फटकासंदीप प्रधान - मुंबईकेंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यात ग्रामीण भागात प्रचलित बाजारभावाच्या चारपट भरपाई देण्याची तरतूद कायम ठेवली असली तरी महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केलेल्या नियमावलीनुसार केवळ कमाल अडीचपट भरपाई दिली जाणार आहे. शहरात दुप्पट भरपाई देण्याची तरतूद तशीच्या तशी स्वीकारलेली आहे.काँग्रेस राजवटीत नवीन भूसंपादन कायदा केला गेला. त्यामधील सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट आणि ठरावीक उद्दिष्टांकरिता जमीन संपादित करताना ७० टक्के जमीन मालकांच्या संमतीची अट केंद्रातील भाजपा सरकारने सोमवारी वगळली. मात्र जमिनीच्या दराबाबतची तरतूद तशीच ठेवली. २०१३ च्या भूसंपादन कायद्याच्या कलम २६ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे मूल्य निश्चित करण्याच्या असलेल्या अधिकारानुसार नागरी क्षेत्रापासून ग्रामीण क्षेत्राकडील अंतर जसजसे वाढत जाईल तसतसे मल्टिप्लायर फॅक्टर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. महापालिका क्षेत्रापासून ० ते १० कि.मी. या अंतरामधील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १ राहणार आहे. महापालिका क्षेत्रापासून १० ते २५ कि.मी. अंतरामधील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १.०५ राहणार आहे, तर महापालिका क्षेत्रापासून २५ कि.मी. व त्यापेक्षा अधिक अंतरावरील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १.१० राहणार आहे.विमानतळवासीयांना २२.५ टक्के विकसित जमीननवी मुंबई विमानतळाकरिता जमीन संपादित करताना जमीनमालकांना एकरी २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात येणार आहे. त्यामुळे एक एकर विकसित जमीन मिळणाऱ्याला बाजारभावानुसार चार कोटी रुपये मूल्याची जमीन मिळेल. या जमिनीपैकी १२.५ टक्के जमिनीवर १.५, तर उर्वरित १० टक्के जमिनीवर २.५ एफएसआय दिला जाणार आहे. याखेरीज ज्यांची घरे या प्रकल्पामुळे बाधित होणार त्यांना अन्यत्र घरबांधणीकरिता प्रति चौ.फू. एक हजार रुपये, घरातील सामानसुमान हलविण्याकरिता वाहतूक खर्च, विमानतळाचे १० रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स, असे लाभ दिले जाणार आहेत.जैतापूरवासीयांना २२.५ लाख प्रति हेक्टरजैतापूर येथील सुमारे १० हजार मे.वॅ़ वीजनिर्मिती क्षमता असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाकरिता प्रकल्पग्रस्तांना प्रति हेक्टर २२.५ लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. २५ कोटी रुपये परिसर विकासाकरिता, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांना अणुऊर्जा प्रकल्पातून सवलतीच्या दरातील वीजपुरवठा, एक आयटीआय व एका हॉस्पिटलची उभारणी, नाटे व साखरी येथील मच्छीमारांना नवीन बोटी व नवीन मासळी मार्केट.