शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही!

By admin | Updated: August 2, 2016 05:40 IST

१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.

मुंबई : १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या राज्याचे तुकडे पडू देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला ठणकावले. महाराष्ट्र अखंडच राहील, असा ठराव आणण्याची मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखंड महाराष्ट्राचा मुद्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. आज अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी अखंड महाराष्ट्राची ज्योत तेवत ठेवली. पोवाडे रचले, चळवळ उभी केली. सुमारे ४६ हजार जणांनी अखंड महाराष्ट्रासाठी तुरुंगवास पत्करला. त्यामुळे अखंड महाराष्ट्रावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. लोकसभेत भाजपाच्या एका खासदाराने वेगळ्या विदर्भाचा ठराव आणला. त्याला राज्यातील एका मंत्र्यानेही पाठिंबा दिला. या मंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राची शपथ घेतली आहे, विदर्भाची नाही. त्यामुळे राज्य तोडण्याआधी सत्तेतून बाहेर पडा, असा इशाराही मुंडे यांनी दिला. त्यानंतर, विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील हौदात जमा होत घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा राणे यांनी विभाजन हवे असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा आणि मैदानात या, असे आव्हान भाजपाला दिले. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास जरूर करावा. विदर्भातील जनतेलाही विभाजन नव्हे, तर विकास हवा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिकाही विभाजनाची असेल, तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली. (प्रतिनिधी)>ठराव मंजूर करा ! : नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘राजकीय इच्छाशक्ती दाखवत सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव एकमताने मंजूर करण्यात यावा. भाजपा नेते उलटसुलट विधाने करून चुकीचा संदेश पसवत आहेत.’