शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:17 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी सरकार येण्याचा दावा केला जात आहे.माजी मंत्री आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत आहेत. मलिक यांनी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. 'निकालानंतर काहीही होऊ शकते', असं विधान त्यांनी केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

नवाब मलिक यांनी काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. दरम्यान, माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी निकालानंतर काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.   

Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

"भाजपाचे लोक माझ्याविरोधात लढत आहे, जनतेने मला उमेदवारी घ्या म्हणून सांगितले आहे. या मतदारसंघात एक वेगळाच निकाल समोर येणार आहे. जनतेचा आम्हाला भरगोस पाठिंबा मिळणार आहे. आम्ही महायुतीमध्ये असलो तरीही आम्ही विचारधारा कधीही सोडली नाही. टफ फाईट असताना किंग मेकर आम्ही ठरणार आहे, अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहेत, असा दावा माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला. 

नवाब मलिक म्हणाले, बारामतीमधून अजित पवार निवडून येतील. पवार कुटुंबाने एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे, असंही मलिक म्हणाले. भाजपाच्या 'बटोगे तो कटोगे' या स्लोगनवर बोलताना मलिक म्हणाले, ही  वाह्यात स्लोगन आहे.  या स्लोगनमुळे यांचा फायदा होणार नाही, उलट याचा तोटा होणार आहे.  उत्तर प्रदेशमधील निकाल या राजकारणामुळे असे निकाल आले आहेत. आता 'एक है तो सेफ है', मला वाटतंय भाजपाचा दृष्टीकोण बदलत आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, शिख सर्वांनी एक राहिले पाहिजे.  जाती, धर्मा, भाषा असताना सर्व लोक एक राहिले पाहिजे अशी आमची विचारधारा आहे. जर भाजापाची विचारधारा बदलत असेलतर चांगली गोष्ट आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. 

'निकालानंतर काहीही होऊ शकते'

"माझ्या शर्तीवर पाठिंबा राहिलं. काही वेगळ्या गोष्टी होत असेल तर आमचा पाठिंबा राहणार नाही. आम्ही सरकारमध्ये किंगमेकर राहणार आहे. २३ तारीख येऊद्या कोण कोणासोबत राहते हे त्यावेळी कळेल, असं मोठं विधान नवाब मलिक यांनी केले. सगळ्यांनीच आता पॉलिटीकल अॅडजस्टमेंट केली आहे, २०१९ च्या निवडणुकीत जसं झाले तसे याही निवडणुकीत निकालानंतर काहीही होऊ शकते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकSharad Pawarशरद पवार