शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांच्या पसंतीस महाराष्ट्रच अव्वल

By admin | Updated: December 31, 2015 04:20 IST

आपल्या राज्यातील गुंतवणूक धोरण, पायाभूत सुविधा उत्कृष्ट असल्याचे सांगत आपलेच राज्य गुंतवणुकीसाठी अव्वल असल्याचे दावे विविध राज्यांकडून होत असतात. पण उद्योगांची शिखर संस्था

मुंबई : आपल्या राज्यातील गुंतवणूक धोरण, पायाभूत सुविधा उत्कृष्ट असल्याचे सांगत आपलेच राज्य गुंतवणुकीसाठी अव्वल असल्याचे दावे विविध राज्यांकडून होत असतात. पण उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘असोचेम’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून गुंतवणूकदारांच्या पसंतिक्रमात महाराष्ट्रच अव्वल असल्याचे दिसून आले आहे. विविध राज्यांतील गुंतवणुकीचे तुलनात्मक विश्लेषण या विषयावर २१ राज्यांतील गुंतवणुकीचे चित्र, स्थिती आणि कल यांचा वेध घेत असोचेमने एक अहवाल तयार केला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीतील गुंतवणुकीच्या स्थितीचा आढावा या अहवालात घेण्यात आला असून देशी व विदेशी अशा सर्व गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच पहिली पसंती दिल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक होता आणि तिसऱ्या स्थानावर ओडिशा राज्य राहिले. देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एक चतुर्थांश गुंतवणूक ही केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा अशा तीन राज्यांत झाली असल्याचे दिसून आले. यावरून त्या तीन राज्यांना असलेली मागणी आणि या राज्यांतील उद्योगाचे स्थान अधोरेखित होते, असे मत असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी व्यक्त केले. या अहवालाच्या आधारे, डिसेंबर २०१४ च्या अखेरीस देशातील विविध राज्यांत झालेल्या गुंतवणुकीच्या आकडेवारीच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. सुमारे १५ लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे. तर महाराष्ट्राशी तगडी स्पर्धा करत ९.२ टक्क्यांच्या गुंतवणुकीसह गुजरातने दुसरा क्रमांक गाठला आहे. गुंतवणुकीत साडेसात टक्क्यांच्या हिश्शासह ओडिशा तिसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक ६.८ टक्के, तामिळनाडू ६.५ टक्के अशी क्रमवारी राहिली आहे. देशातील २१ राज्यांत जी एकूण गुंतवणूक झाली त्यापैकी ८४.५ लाख कोटी रुपये गुंतवणूक ही खासगी उद्योगांकडून झाली. टक्केवारीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत प्रत्येक वर्षी गुंतवणुकीच्या प्रमाणात सरासरी ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते.