शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

७३ टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र ठरले तिसरे राज्य

By admin | Updated: June 27, 2014 18:45 IST

सामाजिक न्यायाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतानाच महाराष्ट्र हे ७३ टक्के आरक्षण देणारे देशात तिसरे राज्य ठरले आहे. यापूर्वी झारखंड आणि कर्नाटक राज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षण दिले आहे.

न्यायाची भूमिका : झारखंड आणि कर्नाटकच्या रांगेतविलास गावंडे - यवतमाळसामाजिक न्यायाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतानाच महाराष्ट्र हे ७३ टक्के आरक्षण देणारे देशात तिसरे राज्य ठरले आहे. यापूर्वी झारखंड आणि कर्नाटक राज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षण दिले आहे. कुठल्याही राज्याच्या आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यावर जावू नये असे संकेत आहेत. मात्र राज्यातील सत्तारूढ सरकारने निर्णय घेतल्यास आरक्षणाची टक्केवारी वाढविली जावू शकते. हा प्रयोग यापूर्वी झारखंड आणि कर्नाटक राज्यात झाला आहे. तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण ६९ टक्के आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. छत्तीसगड राज्यात आरक्षणाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष बिल पारित करण्यात आले होते. या राज्यात आरक्षणाची टक्केवारी त्यामुळेच ५८ एवढी झाली आहे.आरक्षणाच्या या खेळात महाराष्ट्र राज्य बरेच माघारले होते. मात्र मराठा समाजाला १६ आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देत एकदम २१ टक्क्यांची वाढ करण्यात आली. यासोबत महाराष्ट्राचे एकूण ७३ टक्के आरक्षण झाले आहे. वंचितांच्या उन्नतीचा मार्ग सुकर व्हावा यादृष्टीने प्रत्येकवेळी आरक्षणात वाढीचा निर्णय घेण्यात आला. विविध संस्था, संघटनांनी यापूर्वीही आरक्षणामध्ये वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले. मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला.