शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: May 8, 2017 19:48 IST

मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अनेकांनी पुरस्कार पटकावले आहेत. रसिका प्रॉडक्शन्सच्या अनामिका संस्थेच्या कोड मंत्र या नाटकास रु. 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच सुबक, मुंबई या संस्थेच्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकास रु. 3 लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या पुरस्कारांनी दिग्दर्शकांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. मग्न तळ्याकाठी या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना (रु.1,50,000/-) प्रथम पारितोषिक देण्यात आलं आहे. तर कोडमंत्र या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी  राजेश जोशी यांना (रु.1,00,000/-) द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तर  अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनाही (रु.50,000/-) रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे. मनस्विनी लता रविंद्र यांनी लेखन केलेल्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकाला (रु.1,00,000/-) प्रथम पारितोषिक मिळालं आहे. तर मग्न तळ्यासाठी या नाटकाच्या लेखनासाठी महेश एलकुंचवार यांना (रु.60,000/-) द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. तसेच विजय निकम लिखित कोडमंत्र या नाटकाला (रु.40,000/-) तृतीय पारितोषिक मिळालं आहे. तसेच 2 ते 6 मे 2017 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे,  अजित सातभाई आणि सुनील देवळेकर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
इतर पुरस्कार
प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) रवि रसिक (नाटक-मग्न तळयाकाठी), द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) भोतेश व्यास, (नाटक-कोडमंत्र), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) योगेश केळकर (नाटक-किमयागार)
 
नेपथ्य: प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)प्रसाद वालावलकर (नाटक-कोड मंत्र), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) प्रदिप मुळये(नाटक-मग्न तळयाकाठी), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) प्रदिप मुळये (नाटक-अमरफोटो स्टुडिओ)
 
संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक(रु.40,000/-) आनंद मोडक व राहुल रानडे(नाटक-मग्न तळयाकाठी) द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) सचिन जिगर (नाटक-कोडमंत्र) तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) राहुलरानडे (नाटक-बंध-मुक्त)
 
वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (नाटक-मग्नतळयाकाठी) द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) कल्याणी कुलकर्णी-गुगले(नाटक-अमर फोटो स्टुडिओ) तृतीयपारितोषिक (रु.20,000/-) अजय खत्री(नाटक-कोड मंत्र)
 
रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)अभय मोहिते (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) शरदसावंत (नाटक-मग्न तळयाकाठी)
तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) संतोषपेडणेकर व हेमंत कदम (नाटक-कोड मंत्र)
 
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.50,000/-
पुरुष कलाकार : चिन्मय मांडलेकर (नाटक-मग्न तळयाकाठी), अमेय वाघ (नाटक-अमरफोटो स्टुडिओ), वैभव मांगले (नाटक-मग्नतळयाकाठी), सुव्रत जोशी (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), प्रशांत दामले (नाटक-साखर खाल्लेला माणूस)
स्त्री कलाकार : मुक्ता बर्वे (नाटक-कोड मंत्र),निवेदिता सराफ (नाटक-मग्न तळयाकाठी),लिना भागवत (नाटक-के दिल अभी भरानही), हेमांगी कवी (नाटक-ती फुलराणी), इलाभाटे (नाटक-यू टर्न-2)