मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या नातेवाइकांवरील दोन केसेस विशेष एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) न्यायालयातून विशेष पीएमएलएकडे वर्ग करण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) दिवाणी व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांकडे अर्ज केला आहे. ‘भुजबळांवरील दोन केसेस विशेष एसीबी न्यायालयातून विशेष पीएमएलए न्यायालयात वर्ग करण्यात याव्यात, यासाठी ईडीने प्रधान न्यायाधीशांकडे अर्ज केला आहे. त्यावर एसीबीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत,’ अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र सदन घोटाळा; केस वर्ग करण्याची मागणी
By admin | Updated: October 20, 2016 05:57 IST