शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य; तामिळनाडू दुसऱ्या स्थानी!

By admin | Updated: June 30, 2016 04:55 IST

देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक आॅफ स्टॅटिस्टिक्स आॅन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे

मनोज गडनीस,

मुंबई- औद्योगिकदृष्ट्या देशात कायमच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक आॅफ स्टॅटिस्टिक्स आॅन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे. २०१४-१५ या वर्षात महाराष्ट्राच्या राज्यातंर्गत उत्पन्नाने नऊ लाख ५० हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्याचे या अहवालात नमूद केले असून, २०१३-१४ च्या तुलनेत ही वाढ ५.७ टक्के अधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालाच्या माध्यमातून विविध राज्यांतील प्रगतीची आणि तेथील आर्थिकबाबींची रंजक माहिती पुढे आली आहे. यानुसार, देशातील अर्थकारणात महाराष्ट्र हा देशातील सर्वच राज्यांपेक्षा पुढे राहिल्याचे दिसून आले आहे. राज्यांतर्गत उत्पादनाच्या वाढीमध्ये तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाच लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडू राज्य श्रीमंतीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्या राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील फारकत स्पष्ट करणाऱ्या राज्याच्या वित्तीय तुटीचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे. तामिळनाडू येथील वित्तीय तुटीचा आकडा ३१ हजार ८३० कोटी रुपये इतका आहे. वित्तीय तुटीच्याबाबतीत उत्तरप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथील वित्तीय तुटीचा आकडा हा ३१ हजार ५६० कोटी रुपये आहे. तर वित्तीय तुटीच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. महाराष्ट्रात वित्तीय तुटीचा आकडा ३०,७३० कोटी असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्व राज्यांच्या वित्तीय तुटीच्या आकड्याचे प्रमाण तीन लाख ३३ हजार ३३० कोटी असल्याचे दिसून आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील हे प्रमाण असून त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये ८.८ टक्क्यांनी घट झाल्याची नोंद आहे.>फॅक्टरी आणि कृषी क्षेत्रातील स्थिती चिंतनीयदेशात उत्तरेकडील राज्यांत फॅक्टरीचे प्रमाण कायमच लक्षणीय राहिले आहे. मात्र, फॅक्टरी बंद होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसले आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात उत्तरेकडील राज्यांत १२,७७० फॅक्टरी होत्या. यामध्ये घट होत २०१३-१४ मध्ये हा आकडा १२,२७८ इतका खाली आला आहे.देशपातळीवरील आकडेवारीचा विचार करता, २०१२-१३ या आर्थिक वर्षात दोन लाख २४ हजार ५७६ या संख्येत घट होत हा आकडा त्यानंतरच्या आार्थिक वर्षात दोन लाख २२ हजार १२० इतका कमी झाल्याचे दिसते. फॅक्टरीप्रमाणेच देशातील कृषी क्षेत्रातही घट झाल्याचे दिसते. २०११-१२ या वर्षातील उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील पेरणी क्षेत्रात २२,०११ हेक्टरवरून २१, ८७४ हेक्टर अशी कपात झाल्याचे दिसते. कृषी क्षेत्राच्या घसरणीत महाराष्ट्रापाठोपाठ राज्यस्थानचा क्रमांक लागत असून तेथील पेरणी क्षेत्रातही लक्षणीय घसरण झाली आहे. वीज उपलब्धतेच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातचा क्रमांक आहे. मात्र, वीजेच्या दरडोई मुबलक उपलब्धतेच्या बाबतीत दादरा, नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा नंबर पहिला आहे.