गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात बुधवारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३५ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे २० हजार ४४४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत २६ लाख ८३३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २२ लाख ८३ हजार ०३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या २ लाख ६२ हजार ६८५ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५३ हजार ७५९ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.७८ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:24 IST
Coronavirus : बुधवारी आढळले होते ३१,८५५ नवे रुग्ण, गेल्या चोवीस तासांत मुंबईतही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित
ठळक मुद्देबुधवारी आढळले होते ३१,८५५ नवे रुग्ण गेल्या चोवीस तासांत मुंबईतही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद