शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाराष्ट्र रत्नांचा दिमाखदार गौरव सोहळा...

By admin | Updated: April 2, 2016 05:00 IST

उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील तमाम दिग्गजांनी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुरस्कृत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या ‘लोकमत’ समूहाच्या पुरस्कार सोहळ्यास

उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील तमाम दिग्गजांनी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुरस्कृत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या ‘लोकमत’ समूहाच्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून शुक्रवारची संध्याकाळ श्रीमंत केली..! विविध क्षेत्रातील नामांकनप्राप्त मान्यवरांसह आयएएस, आयपीएस अधिकारी आणि राजकारणातील धुरंधरांसह रसिकांच्या प्रचंड गर्दीत व अलोट उत्साहात मुंबईत एनसीपीएच्या भव्य सभागृहात हा सोहळा दिमाखात पार पडला. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले.
  
 
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून रुग्णांना मुक्त करणारे टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक  डॉ. राजेंद्र बडवे यांचा ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ पुरस्काराने, जगाला आपल्या आवाजाची भुरळ  पाडणाऱ्या प्रख्यात गायिका आशा भोसले यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, विविध क्षेत्रांत  कर्तृत्वाचा सोनेरी ठसा उमटवणाऱ्या नीता अंबानी यांचा ‘महाराष्ट्र युथ आयकॉन आॅफ द  इयर’ पुरस्काराने तर ‘बाजीराव मस्तानी’फेम रणवीर सिंह याचा ‘लोकमत अभिमान’  पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी अभिनेता आमीर खान व रणवीर सिंह हे एकत्र  आले व त्यांनी ‘मल्हारी’ गाण्यावर ठेका धरल्याचा दुर्मीळ आनंद रसिकांना मिळाला.
     
  
 
 
‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार विजेत्यांची नावे - 
लोकसेवा , समाजसेवा - रज्जाक जब्बारखान पठाण
विज्ञान तंत्रज्ञान - प्रा. दिपक फाटक (आयटी तज्ञ)
परफॉरमिंग आर्ट - शंकर महादेवन
कला - शशिकांत धोत्रे, पेन्सील स्केच
क्रीडा - ललिता बाबर
रंगभूमी - मुक्ता बर्वे
चित्रपट (स्त्री) - अमृता सुभाष
चित्रपट (पुरुष) - नाना पाटेकर
इन्फ्रास्ट्रक्चर -  सतीश मगर
बिझनेस - डॉ आनंद देशपांडे
प्रशासन - विभागीय -  संदीप पाटील, (जिल्हा पोलिस प्रमुख, गडचिरोली)
प्रशासन - राज्यस्तर - अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त
राजकारण / कोणाकडून आहेत अपेक्षा? - खासदार राजीव सातव - काँग्रेस - मराठवाडा
राजकारण / प्रभावी राजकारणी कोण? - नितीन गडकरी - भाजपा - विदर्भ