शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

देशात निर्यातीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

By admin | Updated: March 30, 2016 00:29 IST

देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९ टक्के असला तरीही त्यात एकट्या महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ४६ टक्के आहे. निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला

नवी दिल्ली : देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९ टक्के असला तरीही त्यात एकट्या महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ४६ टक्के आहे. निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.‘असोचेम’ या उद्योग संघटनेच्या एका अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातशिवाय तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा या पाच राज्यांत समावेश होतो. २००७-०८ ते २०१४-१५ या वित्तीय वर्षातील निर्यातीचे विश्लेषण केले असता पहिल्या स्थानासाठी महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येते; मात्र २०१४-१५ या वर्षात ७२.८३ अब्ज डॉलरची निर्यात करून महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकले. या काळात गुजरातमधून ५९.५८ अब्ज डॉलरची निर्यात झाली. गुजरातनंतर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. या काळात तामिळनाडूतून २४.४७ अब्ज डॉलरची निर्यात झाली. या अभ्यासात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना भौगोलिकदृष्ट्या विशाल सागरी किनारा असल्याने त्यांना निर्यातीत फायदा झाला. पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना मात्र निर्यात वाढविण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सेवांत सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते टिकून राहणार नाहीत. निर्यात वाढविण्यात विशेष आर्थिक क्षेत्राचीही (सेझ) महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते. देशात सध्या सक्रिय असलेल्या एकूण ‘सेझ’पैकी तीन चतुर्थांश सेझ महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या सहा राज्यांत आहेत. विशेष म्हणजे हीच राज्ये निर्यातीत आघाडीवर आहेत. या अभ्यासात पुढे म्हटले आहे की, सध्याची अप्रत्यक्ष करप्रणाली निर्यातीला प्रोत्साहन देणारी नाही. त्याचबरोबर राज्या-राज्यात निर्यातीसाठी असलेल्या संधीत विविधता आहे. ही रचना ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाच्या विरुद्ध आणि आयातीला प्रोत्साहन देणारी आहे.निर्यातीचे वृद्धीदर कमी- निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये अग्रेसर असली तरीही त्याचा निर्यातविषयक वृद्धीदर उत्तर प्रदेश व हरियाणा यासारख्या राज्यांपेक्षा कमी आहे. - २०१४-१५ या वित्तीय वर्षात उत्तर प्रदेशची निर्यात १८.३ टक्के, तर हरियाणाची निर्यात १४.४ टक्के इतक्या वेगाने वाढली. - गुजरातच्या निर्यात दराचा वेग ८ टक्के, तर महाराष्ट्राचा निर्यात दर ७.२ टक्के राहिला, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.