शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:38 IST

आझाद मैदान दंगल प्रकरणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांची परवानगी नसतानाही गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला.

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आझाद मैदान दंगल प्रकरणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांची परवानगी नसतानाही गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. या प्रकरणी सहा महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करणे कायद्याने बंधनकारक असताना पोलिसांनी अद्याप ते दाखल केले नाही. त्यामुळे न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज ठाकरे व त्यांच्या कार्यर्त्यांवरील गुन्हा रद्द केला.सदर गुन्हा रद्द करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ‘अशा गुन्ह्यांत सहा महिन्यांत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मात्र पोलिसांनी सहा महिन्यांत आरोपपत्र दाखल केले नाही. तसेच ज्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्याच कलमांतर्गत दंड ठोठावून गुन्हेगारांना सोडण्याची तरतूद आहे. आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याने गुन्हा रद्द करण्यात यावा,’ अशी विनंती मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी न्यायालयाला केली. उच्च न्यायालयाने शिरोडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द केला. राज ठाकरे यांनी जरी गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला नसला तरी त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने संपूर्ण केसच रद्द केल्याने राज ठाकरेंना पुढे ही केस लढवण्याची आवश्यकता नाही.