13 Apr, 26 11:58 AM
कल्याण अहिल्यानगर महामार्गावर कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात जोरदार धडक; ८ जण ठार झाल्याची माहिती
कल्याण अहिल्यानगर महामार्गावर कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात धडक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली असून ८ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
13 Apr, 26 11:50 AM
खरात प्रकरणी ईडीची कारवाई, ११ ठिकाणी टाकली धाड
भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीने ११ ठिकाणी छापेमारी केली. नाशिक, शिर्डी, पुण्यात ईडीने टाकली धाड. मालमत्तेची चौकशी सुरू आहे.
13 Apr, 26 11:22 AM
सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
"अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. पण सुनेत्रा पवार यांना जर भाजपा मुख्यमंत्री करणार असतील, तर तो भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवारांना राजकीय वारसदार बनवून जात असल्याचे या बोलण्यातून दिसते," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
13 Apr, 26 11:06 AM
शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? - संजय राऊतांचा सवाल
"शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर कोणीही पवार असतील; तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे उभे आहात," असे विधान उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
13 Apr, 26 10:29 AM
होर्मुझवरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी
अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध काहीकाळ थांबले आहे. युद्धबंदी केल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात शांतता चर्चा सुरु झाली होती, पण त्या चर्चा निष्फळ ठरल्या. याच पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली न केल्यास अमेरिका इराणी जहाजांची आणि इतर देशांच्या जहाजांची नाकेबंदी करेल, असा इशारा अमेरिकेने इराणला दिला आहे.
13 Apr, 26 10:27 AM
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झाल्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली. आज सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी २ वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रँड येथे आशा ताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
13 Apr, 26 10:26 AM
सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३९९.७७ अंकांनी घसरून ७६,१५०.४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
13 Apr, 26 10:25 AM
आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण
आज १३ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर बाजार उघडताच सोन्याच्या भावात १,०४० रुपये आणि चांदीच्या भावात ५,३३९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.