शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सर्वाधिक बालगुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:39 IST

देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी बुधवारी लोकसभेत दिली. किशोरवयीन मुलांकडून गुन्हे होण्याचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात घडत आहेत. भाजपचे कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अहिर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांत देशभरात एकूण १,३३,१२१ किशोरवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील २२,६१० आणि मध्यप्रदेशातील २३,०३७ मुलांचा समावेश होता. २०१३ च्या तुलनेत २०१४ आणि २०१५ मध्ये दोन्ही राज्यांत बालगुन्ह्यांच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. यादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या संख्येत मध्यप्रदेशमध्ये वाढ, तर महाराष्ट्रात घट झाली. मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीमागील कारणांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अहिर म्हणाले की, सरकारने याबाबत कोणताही अभ्यास केलेला नाही. बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासाठी गेल्या वर्षी १५ जानेवारीपासून नवा कायदा आणण्यात आला आहे, असेही हंसराज अहिर म्हणाले.