शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर - प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 05:08 IST

जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे.

मुंबई : जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. देशात होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीच्या ५० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून प्रभू बोलत होते. उद्योग आणि राजकारण करताना ‘लोकमत’ची साथ लागतेच हे मनोमन पटल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. त्यामुळेच उद्योग, सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा टप्पा असून, त्याविषयी त्यांचे कौतुक असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपेक्षा कमी काळात देशाचे उज्ज्वल चित्र जगभर निर्माण केले आहे. त्यामुळे देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बदलत्या लोकमतामुळेही गुंतवणूक वाढली आहे. येत्या काळात आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रस्थानी असणार आहे. पुढच्या काळात जगातील प्रगत देशांसोबत महाराष्ट्राचीही तुलना केली जाईल, असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला. प्रभू पुढे म्हणाले की, उद्योग-धंद्यांबरोबरच आता सेवाक्षेत्र विकसित होत आहे. गुंतवणुकीत या क्षेत्राचा वाटा ६० टक्के इतका आहे. भविष्यात हा वाटा आणखी वाढेल, अशी आशा आहे. उत्पादकता नव्हेतर, सेवाक्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यामुळे आता शेतीबरोबरच शेतकऱ्यांचा विकास यावर मुख्यमंत्र्यांनी धोरण आखले आहे. गेल्या ५० वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही, त्याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृतिशील धोरण राबवित आहेत. आपल्याकडे उद्योजकतेला पूरक वातावरण असल्यामुळे भविष्यातही गुंतवणूक वाढेल. चीनमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवित आहे. पण, मुळात उद्योजकता असण्याची गरज असते. आपल्याकडे उद्योजकता अधिक असल्यामुळे गुंतवणूक होते, असेही प्रभू शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)>‘...नाहीतर जेवायला मिळणार नाही’महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलत असताना गोव्याबद्दलही बोलले पाहिजे. माझी बायको गोव्याची आहे, नाहीतर घरी गेल्यावर जेवण मिळणार नाही, असे प्रभू म्हणताच हास्याची लकेर उमटली. गोवा, महाराष्ट्र ही भावंडे आहेत. राज्याला ७२० किमीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनाप्रमाणेच महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास व्हायला हवा, असेही ते म्हणाले. >‘देशांतर्गत पर्यटन वाढावे’पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत, मात्र आता देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशांतर्गत पर्यटन वाढल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटक आपल्याकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा प्रभू यांनी या वेळी व्यक्त केली.