शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय कला उत्सवात महाराष्ट्राला दोन पुरस्कार

By admin | Updated: December 13, 2015 01:59 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित लोककलांची राष्ट्रीय स्पर्धा ‘कला उत्सव २0१५’मध्ये महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तमाशा’ व ‘लोकसंगीत पोवाडा’ला

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित लोककलांची राष्ट्रीय स्पर्धा ‘कला उत्सव २0१५’मध्ये महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तमाशा’ व ‘लोकसंगीत पोवाडा’ला वेगवेगळ्या गटात तिसऱ्या क्रमांकाचे दोन पुरस्कार प्राप्त झाले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह व रामशंकर कथेरियांच्या हस्ते हे पुरस्कार सिरी फोर्ट सभागृहात प्रदान करण्यात आले. दिल्लीच्या बालभवनात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतील १४00 विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय कला उत्सवाचा मुख्य हेतू ग्रामीण भारतातल्या विविध समुदायांच्या लोककला, तसेच आदिम संस्कृतीतल्या कलागुणांच्या योगदानाची देशाला ओळख व्हावी; समाजात त्यांच्याविषयी सन्मान व सद्भावना जागृत व्हावी असा आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तमाशाला तृतीय, तसेच लोकसंगीत वर्गात पोवाड्यालाही तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकात राज्यातल्या १६ विद्यार्थिनी व २५ विद्यार्थी होते. महाराष्ट्राच्या विद्यार्थी विकास विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे समन्वयक व प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, कार्यक्रम अधिकारी सलील वाघमारे यांनी पथकाच्या वतीने पुरस्कार स्वीकारले.पुरस्कार सोहळ्यात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, विख्यात लेखक रस्किन बाँड, विख्यात नृत्यांगना सोनल मानसिंग आदी मान्यवर विशेष अतिथी या नात्याने उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)