शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राकडे सहा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद

By admin | Updated: July 8, 2016 00:20 IST

पुणे, कोल्हापूर, नाशिक, लातूर जिल्ह्याला आयोजनाचा मान.

नीलिमा शिंगणे/ अकोला स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात येणार असलेल्या ६२ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २0१६-१७ चा वार्षिक कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा महाराष्ट्राकडे सहा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले. स्पर्धा आयोजनाचा मान पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि लातूर जिल्ह्याला मिळाला आहे.पुणे येथे १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात घेण्यात येतील. तसेच १९ वर्षाआतील अँथलेटिक्स स्पर्धा पुणे येथेच डिसेंबरच्या शेवटी होतील, तर कोल्हापूर जिल्ह्याला कबड्डी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी देण्यात आली. कोल्हापूरला १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील कबड्डी स्पर्धा होतील. ही स्पर्धादेखील नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याला होईल. नाशिक येथे १४ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील बॅडमिंटन स्पर्धा होईल, तर लातूरला नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्याला १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील सायकलिंग स्पर्धा घेण्यात येईल.देशभरात ५१ ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, तेलंगणा राज्याला सर्वाधिक आठ स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. विदर्भाला यंदा एकाही स्पर्धेची जबाबदारी नाही!शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये सदैव अग्रेसर असलेल्या विदर्भ प्रदेशाला यंदा एकाही राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळालेले नाही, याबाबत क्रीडा तज्ज्ञांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.