शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

महाराष्ट्र ‘गार’पटला

By admin | Updated: April 12, 2015 02:40 IST

राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला

चोवीस तासांत १३ बळी : आंबा, गहू, ज्वारीचे नुकसान; राज्यभरात अवकाळीचे थैमानमुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला असून, शुक्रवारी पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता़ तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा, तर अन्य घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़ यामध्ये बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला़ बीड, परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, आंबा, गहू, ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ बीड जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. वीज पडून औरंगाबादजवळ शेख शमशाद शेख तय्यब (२२) या शेतमजूर महिलेचा, बीड जिल्ह्यात श्रीराम सोपान पाचनकर (४२), दत्ता खाडे (१८) यांचा मृत्यू झाला़ बीडच्या पाटोदा तालुक्यात भिंत पडून शकुंतला रायचंद संचेती (७०) ही महिला मृत्युमुखी पडली़ परभणी आणि जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टागुजरातवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर दक्षिण गुजरातपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे ओढले जात असून, त्यातून राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, वडूजमध्ये लिंबूच्या आकाराच्या गाराही पडल्या.पश्चिम वऱ्हाडला अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी पुन्हा एकदा झोडपले. वीज पडून लोणार तालुक्यात गजानन चोरमारे (३२) हा ठार झाला़ मलकापूर येथे वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून शे़ हुसेन शे़ ग्यासोद्दीन याचा दुर्दैवी मृत्यू झाला़ खान्देशात वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे वीज पडून देवीदास भिका ठाकरे हा मजूर ठार झाला. भुसावळ, चाळीसगावसह बोदवड येथे पावसासह गारपीट झाली.