शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या सुरेश द्वादशीवार यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार

By admin | Updated: December 16, 2015 01:51 IST

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या साहित्य व समाजकार्य (२०१५) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, वैचारिक व ललित साहित्यातील

नागपूर : महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या साहित्य व समाजकार्य (२०१५) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, वैचारिक व ललित साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना देण्यात येणार आहे. दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य व समाजकार्य या दोन्ही क्षेत्रातील प्रत्येकी पाच म्हणजे एकूण दहा पुरस्कार दिले जाणार असून, समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार विद्या बाळ, पुणे (दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह), उत्तम कांबळे, नाशिक, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह), भीम रासकर, पुणे, महिला राजसत्ता आंदोलनातील कार्याबद्दल प्रबोधन विभागातील कार्यकर्ता पुरस्कार, कृष्णा चांदगुडे, नाशिक, जातपंचायतीच्या विसर्जनासाठीचे कार्य केल्याबद्दल, सामाजिक प्रश्न विभागातील कार्यकर्ता पुरस्कार, पल्लवी रेणके (मुंबई) यांना भटक्या-विमुक्तांसाठी असंघटित कष्टकरी विभागात कार्य केल्याबद्दल अनिता दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थचा (प्रत्येकी ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह) पुरस्कार देण्यात येणार आहे, तर साहित्य पुरस्कार विजेत्यांत शरद बेडेकर, मुंबई यांच्या ‘समग्र निरिश्वरवाद’ या पुस्तकाला वैचारिक ग्रंथ पुरस्कार, नितीन दादरावाला, ‘प्रतिमा आणि प्रचिती’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, नागपूर यांच्या ‘खेळकर’ या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार, तर अजित देशमुख, मुंबई यांच्या ‘सुस्साट’ या नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार (प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह) दिला जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या समारंभात केले जाणार आहे. या पुरस्कारांची निवडप्रक्रिया साधना ट्रस्ट (पुणे) यांच्या वतीने केली जाते.