Maharashtra Election 2019 : ''गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहे''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 03:38 PM2019-10-11T15:38:52+5:302019-10-11T15:41:11+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे.

Maharashtra Election 2019 : NCP Sharad Pawar Slams BJP Amit Shah | Maharashtra Election 2019 : ''गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहे''

Maharashtra Election 2019 : ''गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहे''

Next

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव असून राज्याची निवडणूक देखील माझ्याच नावावरच लढवत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी आज शिरूर येथे संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या सभेला संबोधित केले.

गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या प्रचारसभेत सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचे बोलतच नाही. सरकार राज्यातील महागाईवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, आत्महत्यांवर, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर का बोलत नाही असा सवाल देखील शरद पवारांनी उपस्थित केला. 

आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेले काम नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड येथे तरूणांना नोकऱ्यांवरून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती हाताळण्याची क्षमता यांच्यात नसल्याचे सांगत शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019 : NCP Sharad Pawar Slams BJP Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.