शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला विनाशकारी भूकंपाचा धोका नाही

By admin | Updated: April 11, 2016 02:39 IST

हिंदूकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले असले तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही.

नितीन अग्रवाल,  नवी दिल्लीहिंदूकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले असले तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या काही भागाला संवेदनशील मानले; मात्र भूगर्भीय हालचालींच्यादृष्टीने ही स्थिती सर्वात कमी धोकादायक मानली जाते.भूकंपाचा धोका पाहू जाता देशाला चार झोनमध्ये विभाजित करण्यात आल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे दस्तऐवज सांगतात. यातील पाचवा झोन सर्वाधिक धोकादायक असून, दुसऱ्या झोनला कमी धोकादायक मानले जाते. > संवेदनशील १०७ शहरांच्या यादीत मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणेही...भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) अहवालात भूकंपाबद्दल संवेदनशील अशा १०७ शहरांची यादी तयार करण्यात आली असून त्यात मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, तारापूर आणि ठाणे या शहरांचा समावेश आहे. ही शहरे कमी संवेदनशील अशा दुसऱ्या आणि तिसऱ्या झोनमध्ये येत असल्यामुळे भूकंपाचा धोकाही कमी आहे. बीआयएसने महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीच्या काही भागाला धोकादायक अशा झोन चारमध्ये ठेवले आहे. या झोनमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगालचा उत्तर भाग, गुजरात आणि राजस्थानचा समावेश आहे> सर्वाधिक धोकादायक झोनमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचलजम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, गुजरातचे रण (कच्छ), उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान-निकोबार बेटाचा समावेश सर्वाधिक धोकादायक अशा झोन पाचमध्ये आहे. केरळ, गोवा, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, प. बंगाल, राजस्थानसह उर्वरित भाग कमी धोकादायक अशा झोन तीन आणि दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भूकंपाच्या संकट निर्देशांकाची गणना भूवैज्ञानिक आणि भूआकृतिविज्ञानासह एकूण ७ मानकांच्या आधारे करण्यात आली आहे. बीआयएसने भूकंपामुळे इमारतींना होणारा धोका टाळण्यासाठी भूकंपविरोधी इमारतींचे डिझाईन तयार केले आहे. सध्याच्या इमारतींना भूकंपरोधक बनविण्यासाठी रिट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.