शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीत महाराष्ट्र ‘दीन’च!

By admin | Updated: April 30, 2016 02:16 IST

गोरेगाव येथील फिल्मसिटी (दादासाहेब फाळके चित्रनगरी) कर्मचाऱ्यांना १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली

मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटी (दादासाहेब फाळके चित्रनगरी) कर्मचाऱ्यांना १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याविषयी चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी ही परवानगी नाकारल्याने कामगारांच्या पदरी उपेक्षाच आली. २२ एप्रिल रोजी रयतराज कामगार संघटनेने फिल्मसिटी व्यवस्थापनाला आणि आरे पोलीस ठाण्याला याविषयी पत्र दिले. मात्र स्टुडिओ क्रमांक १ मध्ये कोणताही कार्यक्रम घेण्यास यापूर्वी परवानगी दिलेली नव्हती, असे कारण पुढे करत १ मेच्या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. वास्तविक, स्टुडिओ क्रमांक १ या ठिकाणी चित्रपट महामंडळाची निवडणूक, चित्रपट कलाकारांच्या विविध २८ संघटनांचे कार्यक्रम, गणपती पूजन यापूर्वीही झाले आहे आणि नेहमी होतात. याविषयी संघटनेचे सरचिटणीस रोहित पांडे यांनी सांगितले की, रयतराज कामगार संघटनेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांनी मिळून पहिल्यांदाच हा कार्यक्रम आखला होता. यात कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप, शालेय शिक्षणातील प्रगतीविषयी सन्मान आणि गुणवंत कामगारांचा सन्मान असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)