शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गुजरातच्या छायेत महाराष्ट्र

By admin | Updated: May 10, 2015 00:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? मराठी माणसाला ‘अच्छे दिन’ आले का?

 संदीप प्रधान -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? मराठी माणसाला ‘अच्छे दिन’ आले का? केंद्रात आणि महाराष्ट्रात यापूर्वी १० वर्षे एकाच पक्षाचे सरकार होते. त्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये गुणात्मकदृष्ट्या काही फरक आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट कबूल करायला हवी ती अशी की, सरकार हा असा अजस्त्र डायनॉसॉर आहे की त्यामध्ये तत्काळ बदल करणे हे इतके सहजसाध्य काम नाही. राजकारणातील तेच परस्परविरोध, नोकरशाहीच्या अंगी मुरलेला तोच निबरपणा, कार्यकर्त्यांमधील लोचटपणाचा स्थायीभाव, जनतेच्या पराकोटीच्या वाढलेल्या (किंवा मोदींनी वाढवून ठेवलेल्या) अपेक्षांचे ओझे यातून हा सरकाररूपी डायनॉसॉरवाटचाल करतो तेव्हा त्याची गती जलद होण्यास म्हणजेच माणसाळण्यास विलंब लागतो.केंद्रातील सरकार वर्ष पूर्ण करीत असताना गेल्या काही दिवसांत दोन ठळक वाद नजरेस आले. त्यातील पहिला गारपिटीमुळे केवळ ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सभागृहात केलेले वक्तव्य व त्यावरून उठलेली आरोप-प्रत्यारोपांची राळ तर दुसरा अवकाळी पावसाने महाराष्ट्रात किती नुकसान झाले याचा अहवाल महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला नसल्याचा त्याच राधामोहन सिंह यांनी केलेला खुलासा व त्यावरून सरकारची झालेली गोची हे आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना आणि या सरकारची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या करड्या शिस्तीच्या पंतप्रधानांच्या हातात असताना महाराष्ट्रातील सरकारवर दोषारोप ठेवला जातो हेच या दोन सरकारांमध्ये पुरेसा संवाद व समन्वय नसल्याचा ढळढळीत पुरावा आहे.विशेष करून सत्तेत सहभागी होऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेच्या हाती कोलीत देण्याचा हा प्रकार आहे. केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असल्याने काही प्रमाणात फरक पडल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी करतात. पर्यावरणाशी संबंधित समित्या गेल्या दोन वर्षे झाल्या नव्हत्या. त्यांना पर्यावरण खाते महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांच्याकडे असल्याने मंजुरी मिळाली.यामुळे अरबी समुद्रात उभे केले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिलच्या जमिनीवर उभे राहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांना गती लाभेल, असे वाटते. एकीकडे हे सकारात्मक पाऊल पडत असताना राज्यातील पर्यावरण खात्यात हजारो फायली गेली तीन वर्षे पडून आहेत, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. नवी मुंबई विमानतळाच्या आठ मंजुऱ्या मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व संबंधितांशी संपर्क साधल्यावर १५ दिवसांत प्राप्त झाल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यातील तीन बंदरे रेल्वेमार्गाने जोडण्याचा निर्णयही असाच केंद्र-राज्य समन्वयाचा परिपाक आहे.