शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युपीआय अ‍ॅपच्यामाध्यमातून महाराष्ट्र बँकेची ६ कोटी ७ लाखाची फसवणूक

By admin | Updated: March 12, 2017 19:40 IST

युपीआय अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून विविध बँकांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे पळविण्याचा धडका सायबर गुन्हेगारांकडून सुरूच

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 12 - युपीआय अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून विविध बँकांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे पळविण्याचा धडका सायबर गुन्हेगारांकडून सुरूच आहे. यात सर्वाधिक फटका महाराष्ट्र बँकेला बसला आहे. महाराष्ट्र बँके ला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांचा आॅनलाईन चुना लावला. याप्रकरणी अखेर बँकेने ८८ खातेदार ग्राहकांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुक आणि सायबर क्राईम कलमानुसार गुन्हा नोंदविला.कॅशलेस व्यवहाराला शासनाने प्राधान्य दिले आहे. ग्राहकांनी जास्तीत जास्त व्यवहार आॅनलाईन करावे, यासाठी बँकांकडून ग्राहकांना आग्रह धरला जातो. मात्र, या आॅनलाईन सेवेचा लाभ देणाऱ्या युपीआय अ‍ॅप्लीकेशन बँका आणि ईमानदार ग्राहकांसाठी डोकंदुखी ठरली आहे. या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून ग्राहकाच्या खात्यात एक रुपयाही नसला तरी त्याच्या मोबाईलचा वापर करुन ग्राहक एक लाखापर्यंतची रक्कम दुसऱ्या खात्यात आॅनलाईन वर्ग करू शकतो. ही बाब सायबर गुन्हेगारांनी हेरली आणि त्यांनी बँक ग्राहकांचा मोबाईल अथवा सीमकार्ड मिळवून त्यांच्या परस्पर बँकेला युपीआय अ‍ॅप्लीकेशनच्या मार्फत विनंती पाठवून जास्तीत जास्त रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेत आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र बँकेच्या विविध शाखांमधून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६कोटी ७लाख रुपये आॅनलाईन लुटले. ही बाब समोर येताच बँकांनी संबंधित ग्राहकांना नोटीसा पाठवून तात्काळ आॅनलाईन लुटलेली रक्कम बँकेत भरण्याचे कळविले. परंतु ग्राहकच त्यांची फसवणुक झाल्याची तक्रार करीत असल्याने शेवटी महाराष्ट्र बँकेचे विभागीय कार्यालयाने याप्रकरणी थेट एमआयडीसी सिडको ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी तपास करीत आहेत.कसे काम करते युपीआय अ‍ॅप्लीकेशनअँड्राईड मोबाईलधारक प्ले स्टोअरमधून युपीआय अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करून घेऊ शकतो. या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आॅनलाईन पैसे वर्ग करता येते. ही सुविधा मोबाईलवरी प्लॅटफार्मवर उपलब्ध आहे. या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून पैसे पाठविणे हे मेसेज पाठविण्याएवढं सोप काम आहे. यामुळे कोणीही या अ‍ॅप्लीकेशचा वापर करुन एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे सहज आणि काही सेकंदात वर्ग करू शकतो. बँकेची फसवणूक आणि खातेदारांचाही विश्वासघातबँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणुक ही खातेदारांनीच केल्याचा बँकेचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र यातील ८०टक्के खातेदारांनाचीच यात ओळखीच्याच लोकांनी विश्वासघाताने त्यांचा मोबाईल अथवा सीमकार्ड घेऊन ही आॅनलाईन लुट केली . यात बँक ग्राहकांचा मोहरा म्हणून सायबर गुन्हेगारांनी वापर केला. मात्र हा व्यवहार ज्या ग्राहकाच्या खातेदाराच्या मोबााईलवरुन झाला ते सर्वजण बँकेच्या लेखी गुन्हेगार आहेत.