शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेकडून अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By admin | Updated: March 13, 2017 03:59 IST

यूपीआय अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खात्यातून परस्पर पैसे पळवत सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र बँकेला तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांचा आॅनलाईन चुना लावला.

औरंगाबाद : यूपीआय अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खात्यातून परस्पर पैसे पळवत सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र बँकेला तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांचा आॅनलाईन चुना लावला. याप्रकरणी बँकेने ८४ ग्राहकांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणूक आणि सायबर क्राईम कलमानुसार गुन्हा नोंदविला.यूपीआय अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकाच्या खात्यात एक रुपयाही नसला तरी एक लाखापर्यंतची रक्कम दुसऱ्या खात्यात आॅनलाईन वर्ग करू शकतो. ही बाब सायबर गुन्हेगारांनी हेरली आणि त्यांनी बँक ग्राहकांचा मोबाईल अथवा सीमकार्ड मिळवून यूपीआय अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेत आहेत, अशा प्रकारे महाराष्ट्र बँकेच्या विविध शाखांमधून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६ कोटी ७ लाख रुपये आॅनलाइन लुटले.ही बाब समोर येताच बँकांनी संबंधित ग्राहकांना नोटिसा पाठवून तात्काळ आॅनलाइन लुटलेली रक्कम बँकेत भरण्याचे कळविले; परंतु ग्राहकच त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार करीत असल्याने शेवटी महाराष्ट्र बँकेचे विभागीय उपमहाव्यवस्थापक रवींद्र सोनजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपी किरण अण्णासाहेब गव्हाड, सुरेश रामचंद्र्र भोसलेसह शहरातील विविध बँक शाखांतील ८४ खातेदारांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान अ‍ॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला.एकाला अटकयूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेचा ग्राहक असलेल्या मित्राचे सीमकार्ड वापरून बँकेला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या राजेश बिस्वास (२८, ह.मु. वाळूज एमआयडीसी, मूळ रा. चंद्रपूर) याला सायबर क्राईम सेलच्या माध्यमातून एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)