शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

By आनंद डेकाटे | Updated: December 9, 2025 15:08 IST

Maharashtra Assembly Winter Session 2025: गुटखा ,मावा, सिगारेट, सुपारी, मान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधीत असून्, आजही मोठ्या प्रमाणात गुटखाच्या माध्यमातून् ड्रग्जचीही विक्री होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे यासंदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील.

- आनंद डेकाटे नागपूर - गुटखा ,मावा, सिगारेट, सुपारी, मान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधीत असून्, आजही मोठ्या प्रमाणात गुटखाच्या माध्यमातून् ड्रग्जचीही विक्री होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे यासंदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील. तसेच, त्यात अधिक सुधारणा करून अशा प्रकरणी मकोका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून १७ लाख ४० हजार रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. नवी मुंबईत ११४४, अहिल्यानगर १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलढाणा ६३४, नागपूर ४९, यवतमाळ १७०६ गुन्हे दाखल करण्यात आले. गुटखा विक्री थांबविण्यासाठी संयुक्त कारवाई पथकेही स्थापन करण्यात आली. अंमली पदार्थाच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निदेंशानुसार जिल्हास्तरीय नाकों कोऑडींनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती अशा समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परीसरात व आजुबाजुच्या परीसरात दुकानांमध्ये नशाजन्य गोळया व चॉकलेट किंवा इतर काही खाद्यपदार्थाचे मुलांना विक्री हेाणार नाहीत, या अनुषंगाने नियमित पोलीसविभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात येत आहे. असे असले तरी अशी विक्री सुरूच असल्याने त्यावर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी कमकुवत कायदा अधिक कठोर व कडक करण्यासाठीचे निदेंश कायदा व विधी विभागाला सांगण्यात आले. मकोका लावतानाच त्यांच्यावर एनसीओसी करता येईल. यासोबतच अशा प्रकरणी दजेंदार पुनर्वसन केंद्र तयार करण्याचेही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रईस शेख यांनी भिवंडीत आजही मोठया प्रमाणात गुटखा व ड्रग्जची विक्री होत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर भिवंडीत विशेष कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

लोकप्रतिनिधींना माहिती देऊगुटखा विक्री थांबविण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले. ही माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात आली नाही. अशा पथकाची माहिती, पथ्कातील सदस्यांची नावे व तक्रार करावयाचा क्रमांक आदींची माहिती व फलक शाळेच्या परीसरात लावावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलीसांना तसे कळवून लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात येईल, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : MCOCA to be invoked in gutka sale cases: Fadnavis announces

Web Summary : Maharashtra will invoke MCOCA against gutka sellers. Raids led to seizures worth ₹17.4 lakhs. Joint task forces and committees are formed to curb drug trade near schools. Special action in Bhiwandi assured.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMCOCA ACTमकोका कायदा