शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या गावाचा होणार कायापालट !

By admin | Updated: April 14, 2016 01:19 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार

- शिवाजी गोरे, दापोली (जि. रत्नागिरी)महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ६५ कि. मी. अंतराचा वाढीव मार्ग उभारून आंबडवे गाव महामार्गाला जोडण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला आहे.महामानवाच्या गावात नतमस्तक होण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दरवर्षी आंबडवेत येतात. मात्र, या ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्याने त्यांचे हाल होतात. आता या गावाची उपेक्षा दूर होण्याची वेळ आली असून विकास आराखड्यानुसार कामे होतील, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड झाल्यानंतर या गावाचा विकास आराखडा बनविण्यात आला. ३६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात भव्य स्मारक, शिल्पसृष्टी, विपश्यना केंद्र, वाचनालय, विश्रामगृह, सुलभ शौचालय, सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज, बँक, क्रीडा संकुलचा समावेश आहे. त्यासाठी जयंती आयोजन समिती यापूर्वीच स्थापन झाली आहे. जयंतीनिमित्त पंचसूत्रीचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पंचसूत्रीमध्ये आंबडवे गावाचा समावेश आहे. रमाई यांच्या गावात विकासकामे सुरूमहामानव बाबासाहेबांची माता रमाई यांचे माहेर वणंद. या वणंद गावाचा ४० कोटी रुपयांचा विकास आराखडाही सरकारने तयार केला आहे. आमदार भाई गिरकर यांनी हे गाव दत्तक घेतले असून, प्रत्यक्ष विकासकामाला सुरुवात झाली आहे. दापोली ते वणंद रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावामोठ्यांची छोटी गावे या मालिकेतून ‘लोकमत’ने आंबडवे आणि वणंद या दोन गावांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारी वृत्ते ‘लोकमत’ने दिली. त्यामुळेच या गावांमधील कामांना गती आली आहे.