शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळ-कोमसापत दुरावा

By admin | Updated: October 17, 2016 03:10 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सन्मानाने सहभागी करून घेतले

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- आतापर्यंत १६ साहित्य संमेलनांच्या आयोजनाचा अनुभव गाठीशी असलेल्या कोमसापला घटक संस्था नसतानाही डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सन्मानाने सहभागी करून घेतले, तर सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी कोमसापने दर्शवली आहे. मात्र, कोमसापचे अस्तित्वच राहिलेले नाही, अशी भूमिका महामंडळाच्या सदस्यांनी घेतल्याने महामंडळ व कोमसाप यांच्यातील दुरावा या संमेलनातही दिसणार आहे.कोमसापला साहित्य महामंडळाची घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणी जुनी आहे. मात्र, महामंडळाने ती मान्य केली नसल्याने कोमसाप आपली वेगळी चूल मांडत आली आहे. घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणी केल्याचे कोमसाप दाखवत असली तरी प्रत्यक्षात ही मागणी रेटत नसल्याने कोमसापला आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश असल्याचे काहींचे मत आहे.अ.भा. साहित्य संमेलनास कोमसापचा पाठिंबा आहे का, असा सवाल कोमसापचे डॉ. महेश केळुसकर यांना केला असता ते म्हणाले की, संमेलनास पाठिंबा द्यायचा म्हणजे आम्ही काय करायचे? संमेलनास पाठिंबा हा घटक संस्थांकडून घेतला जातो. कोमसापला महामंडळाने घटक संस्थेचा दर्जा दिलेला नाही. कोमसापच्या ६० शाखा असून त्याद्वारे विविध साहित्यिक कार्यक्रम घेतले जातात. आतापर्यंत कोमसापने १६ साहित्य संमेलने भरवली आणि ती यशस्वीपणे पार पाडली आहेत. आम्हाला घटक संस्थेचा दर्जा दिलेला नसला तरी कोमसापचा डोंबिवलीतील संमेलनास पाठिंबा आहे. महामंडळाने आमच्याकडे संमेलनासाठी काही मदत मागितली तर ती आम्ही निश्चित करू. सर्व विचारधारांना सामावून घेणारे हे साहित्य संमेलन व्हावे. अमुक एका विचारधारेला बाजूला सारून झालेले साहित्य संमेलन, असा त्याचा लौकिक होऊ नये. संमेलनाचा खर्च पाच कोटींपर्यंत जाणार, असे माझ्या वाचनात आले. संमेलनाचा खर्च आटोपशीर व्हायला हवा. राजकीय मंडळी पैसा देणार म्हणजे त्यांचा वावर आयोजकांना टाळता येणार नाही. मात्र, संमेलनावर त्यांचा प्रभाव असता कामा नये, अशी अपेक्षा केळुसकर यांनी व्यक्त केली. >घटक संस्थेचा दर्जा देण्याचा प्रश्न येत नाहीकोमसापच्या या भूमिकेकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रकाश पायघुडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कोकण हा विभागही महामंडळाच्या अखत्यारित येतो. मात्र, कोमसापही ही स्वतंत्र संस्था आहे. कोमसाप ही स्वतंत्र संस्था असल्याने तिला घटक संस्थेचा दर्जा देण्याचा प्रश्न येत नाही. कोमसापचे अस्तित्व फारसे राहिलेले नाही. महामंडळाच्या या भूमिकेबद्दल कोमसापने आश्चर्य व्यक्त केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही राज्यभरात आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सांगली हे सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा भाग आहेत. त्यात खूप संस्था आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार हा महाराष्ट्राचा सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, हा मुद्दा प्रलंबित आहे. सध्या स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. तसा कोकणचा प्रश्न नाही. घटक संस्थेचा दर्जा दिला नाही म्हणून एखाद्या संस्थेची नाराजी असू शकते, असे पायघुडे म्हणाले.