शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाड पूल दुर्घटना : सरकारी कर्मचारी, एनएचएआयवर कारवाई करा

By admin | Updated: August 9, 2016 20:10 IST

सरकारच्या दिरंगाईमुळे महाडची दुर्घटना घडल्याने संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 09 -  सरकारच्या दिरंगाईमुळे महाडची दुर्घटना घडल्याने संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.२ आॅगस्टच्या मध्यरात्री महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटींशांनी बांधलेला पूल कोसळला. या दुर्घटनेत महाराष्ट्र, गोवा राज्यातील एस. टी आणि खासगी वाहने नदीत वाहून गेली व अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला. आतापर्यंत बचाव कार्य पथकाच्या हाती २६ मृतदेह लागले आहेत. महाडचे माजी आमदार प्रणय सावंत यांनी मुंबई- गोवा महामार्गाचे स्ट्रक्चरल आॅडीट करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे.पूल कोसळण्यास व त्यामुळे होणाऱ्या जिवीतहानीस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी सावंत यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी ठेवली आहे. सावित्री नदी बचाव कार्यासाठी करण्यात आलेला सर्व खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करण्यात यावा, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.