शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरच्या अल्बिनो सापाची राष्ट्रीय पातळीवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनने अतिदुर्मीळ असलेल्या ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ सापावरील केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे.महाबळेश्वर येथील एका घराच्या परिसरात आगळ्या-वेगळ्या प्रकारचा साप आढळून आला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनने अतिदुर्मीळ असलेल्या ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ सापावरील केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे.महाबळेश्वर येथील एका घराच्या परिसरात आगळ्या-वेगळ्या प्रकारचा साप आढळून आला होता. घरमालकाने सर्पमित्र अक्षय गायकवाड व प्रदीप सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सापाची माहिती दिली. यानंतर सर्पमित्रांनी महाबळेश्वर येथे येऊन हा साप पकडला.पकडलेल्या सापाचा वेगळेपणा लक्षात आल्याने सर्पमित्रांनी खंडाळा येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनचे रवी पवार व राहुल तायडे यांना बोलावून त्यांना या सापाची पाहणी करण्यास सांगितले. पाहणीनंतर हा साप अतिदुर्मीळ ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ प्रजातीचा असल्याची माहिती समोर आली. वनविभागाकडे नोंदणी, मोजमाप व इतर पाहणी करून सापाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.हा साप बिनविषारी असला तरी अतिदुर्मीळ असल्याने या सापाची नोंद इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटीकडे करण्यात आली. याबाबत तयार केलेला प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे.अतिदुर्मीळ अन् बिनविषारीहा साप अल्बिनो पहाडी तस्कर प्रजातीमधील अतिदुर्मीळ अन् बिनविषारी असून, त्याच्या मानेवर उभे काळे पट्टे असतात. ऊर्ध्व शरीर गडद तपकिरी रंगाचे असून, त्यावर तोरडी पैंजण सारखी नक्षी असते. पैंजणीत पांढºया रंगाचे ठिपके असतात. शरीराचा मध्यभाग धूसर असतो. हे साप विजेच्या चपळाईने हल्ला करतात. अशी माहिती वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनचे रवी पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.