शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
6
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
7
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
8
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
9
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
10
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
11
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
12
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
13
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
14
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
15
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
16
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
17
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
18
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
19
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
20
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

महाबळेश्वर- महाराष्ट्राचे नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:04 IST

‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.

‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम असून ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून ते ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

महाबळेश्वर या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘महान सामर्थ्यवान ईश्वर’ असून खरोचरच हे ठिकाण दिव्य असून त्याला दैवी देणगी लाभली आहे. पर्यटकांना येथे मोहकता, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिकता याचा अनोखा संगम पाहायला मिळाते. मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोल अशा तीन खेडेगावांनी महाबळेश्वर शहर निर्माण झाले आहे. मुंबईपासून साधारणत: २८५ कि.मी अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाणी पठार आणि खोल द-यांनी वेढले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात तर हा परिसर जलमय होतो. पण त्याचबरोबर त्याचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. मुंबईपासून जवळची थंड हवेची ठिकाण म्हणजे लोणावळा -खंडाळा तसेच माथेरानप्रमाणे या ठिकाणावरील पॉईंट पर्यटकांना नेहमीच आकर्षक करतात. ऐतिहासिक वारस्याबरोबरच येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गावित्री या पाच न उगम पावत असल्याने क्षेत्र महाबळेश्वर म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

पर्यटकांच्या आकर्षणाची खास ठिकाणे म्हणजे पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, वेण्णा लेक, केइंटटस पॉ, एलीफंट पॉइंट, विल्सन पॉइंट, प्रतापगड, लीग्नमाला धबधबा. तसेच येथील अनेक स्मारके थेट ब्रिटीशकाळात घेऊन जातात. महाबळेश्वरपासून सुमारे १९ कि.मी अंतरावर असलेले पाचगणी हे पाच टेकड्यांच्या कुशीतील ठिकाण पर्यटकांना आपल्याकडे अक्षरश: खेचते.

निसर्गाच्या कुशीत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसच्या माध्यमातून राहण्याचीही उत्तम सोय असल्याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच घनदाट जंगलामध्ये वसलेले महिंद्रा शेरवूड रिसॉर्टही नैसर्गिक सौंदर्याची अनुभती देणारे आहे.महाबळेश्वरमधील हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य असल्याने, या भागात मोठ्याप्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर रासबेरी, जांभळाचा मध ही प्रसिद्ध आहे. पर्यटकांना कोणत्याही हंगामात आपल्याकडे आकर्षीत करणारे हे एक उत्तम ठिकाणी आहे. येथे जाण्यासाठी बस, रेल्वे वा विमान सेवेचाही उपयोग करता येईल.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान