शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महायुतीचे जमले?

By admin | Updated: January 19, 2017 03:48 IST

शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली.

सदानंद नाईक,

उल्हासनगर- महापालिका निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली. शिवसेना-भाजपाने आपल्या वाट्याच्या प्रत्येकी पाच जागांवर पाणी सोडत त्या साई पक्षाला देऊन सिंधी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. आता नव्या संभाव्य जागावाटपानुसार शिवसेना २८, भाजपा २८, साई पक्ष १० व रिपाइं १२ जागा लढणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही ९० टक्के युती पक्की असल्याचे सांगितले. उल्हासनगरात ओमी कलानी टीमला भाजपात प्रवेश देण्यास आयलानी यांचा विरोध आहे, तर भाजपाने कलानी यांना प्रवेश दिला किंवा त्यांच्यासोबत हातमिळवणी केली तर पंचाईत होईल, हे शिवसेनेला ठाऊक असल्याने स्थानिक नेत्यांनी वाटाघाटी करून पुन्हा शिवसेना,भाजपा, साई व रिपाइं यांची मोट बांधली आहे. बुधवारी दुपारी शिवसेना-भाजपा युतीबाबतची चर्चा पार पडली असून दोन दिवसांत अंतिम निर्णय घोषित करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख चौधरी व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष आयलानी यांनी दिली. शिवसेनेने बैठकीत सुरुवातीला जुन्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपा प्रत्येकी ३३ आणि रिपाइं १२ जागा अशी मागणी केल्याने वादंग निर्माण झाला होता. सिंधी मतांची विभागणी होऊ नये, म्हणून शिवसेना-भाजपा व रिपाइंच्या महायुतीत साई पक्षाला घेण्याचा निर्णय घेतला. भाजपा ३८ पैकी २८ जागा लढेल व १० जागा साई पक्षाला दिल्या जातील, असे समजते.भाजपाकडून आयलानी, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी, जमनुदास पुरस्वानी, राजा गेमनानी, राम चार्ली तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, धनंजय बोडारे उपस्थित होते. भाजपात फुटीची शक्यता : भाजपातील ज्या गटाने कलानी यांना पक्षात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत उंबरठे झिजवले, ते महायुतीचे जागावाटप अंतिम झाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कलानी यांच्या छत्रछायेखाली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रभाग कलानी यांचे वर्चस्व असलेल्या परिसरात येत असल्याने त्यांना कलानी यांनी भाजपात यावे, असे वाटत होते. मात्र, त्या प्रयत्नांना अपयश आल्याने त्यांच्यापुढे पक्षांतराखेरीज पर्याय राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.>कलानींच्या धास्तीनेच महायुती : ओमी कलानी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे. तसेच गोव्यातील पक्ष कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवारांची यादी घोषित करून प्रचाराला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात ३५ ते ४० उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले आहे. एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे भाजपासोबत जाण्याचे ओमी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खीळ घालण्याकरिता महायुतीचे जागावाटप केल्याचे बोलले जाते.