शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मॅग्मोचे 1 जुलैपासून पुन्हा बेमुदत आंदोलन

By admin | Updated: June 30, 2014 01:42 IST

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 1क् दिवसांत प्रमुख मागण्यांची पूर्तता केली जाईल,

मुंबई : मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 1क् दिवसांत प्रमुख मागण्यांची पूर्तता केली जाईल, या आश्वासनाची पूर्तता मात्र एक महिना उलटून गेला तरीही मागण्या मान्य न झाल्याने 1 जुलैला डॉक्टर दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन आणि सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली. त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होण्याची शक्यता आहे.
मॅग्मो संघटनेच्या पदाधिका:यांनी 2 जून रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर 4 जून रोजी मॅग्मो संघटनेला चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र अजून एकाही मागणीची पूर्तता करण्यात आलेली नाही. मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटना असहकार आंदोलन सुरू करणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील सुमारे 12 हजार वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला संघटनेने आंदोलन केले होते. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला होता. मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलनाच्या बरोबरीनेच सामूहिक राजीनामा देण्याचे संघटनेने ठरविले आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस हे आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणास बसणार आहेत.  1 जून 2क्क्6 पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिका:यांना सहावा वेतन आयोग लागू व्हावा, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिका:यांना केंद्र शासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणो उच्च वेतन मिळावे, 2क्क्9-1क् मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिका:यांना पूर्वलक्षी लाभ देण्यात यावा, अस्थायी स्वरूपात काम करणा:या सुमारे 789 बीएएमएस व 32 बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांना कायम सेवेत घेण्यात यावे, तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाचगणी येथे मॅग्मो संघटनेच्या मॅगकॉन परिषदेत केलेल्या घोषणोनुसार आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा मॅग्मोच्या 11 मागण्या आहेत. (प्रतिनिधी)