शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वेडय़ा मुलांचे हात हिरवे करणारी ‘जादू’

By admin | Updated: June 26, 2014 02:42 IST

बुगुबुगू मान हलवणारा गाण्यातला ‘भोलानाथ’ पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, शाळेभोवती तळं साचल्याने पूर्वी मिळायची ती सुटीची गंमत आता उरली नाही, हे सगळं हल्ली शाळकरी मुलांनाही कळतं.

मुंबई : बुगुबुगू मान हलवणारा गाण्यातला ‘भोलानाथ’ पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, शाळेभोवती तळं साचल्याने पूर्वी मिळायची ती सुटीची गंमत आता उरली नाही, हे सगळं हल्ली शाळकरी मुलांनाही कळतं.
पहिल्यावहिल्या पावसाच्या पाण्यात कागदाच्या होडय़ा सोडायचा आनंद लुटण्याच्या वयातल्या आपल्या 
मुलांना आपण वारसा म्हणून दिली आहे ती दरवर्षी ओढ लावून डोळ्यातून पाणी काढणा:या पावसाची वाट पाहण्याची शिक्षा!
पण आपल्या सुखासाठी सारं सारं ओरबाडणा:या पिढीच्या पोटी जन्माला आली असली तरी आपली मुलं थोडी वेगळी आहेत़़़ ती उन्हाळ्यात तहानल्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात, त्यांच्यासाठी घराच्या बाल्कनीत लाकडी घरटं लटकवण्याचा हट्ट धरतात. त्यांना जंगल  आवडतं. मरणा:या वाघांबद्दल त्यांना प्रश्न पडतात, घरात उगीचच लाइट लावून ठेवणा:या आईबाबांना चार गोष्टी सुनावण्याची त्यांची तयारी असत़े़़ आपल्या मुलांना कळतंय की तुटणारी झाडं, तापलेला उन्हाळा, लांबलेला पाऊस ही काही चांगली चिन्हं नव्हेत. आपण काहीतरी करायला हवं़़़
हा  ‘काहीतरी करू या’चा भुंगा ज्यांच्या डोक्यात सदानकदा भिरभिरत असतो, अशा धडपडय़ा मुलांसाठी आणि ‘गप्प बस’ म्हणून मुलांच्या या वेडेपणावर पाणी न ओतता, अशा मुलांच्या वेडाला खतपाणी घालणारे आईबाबा आणि शिक्षकांसाठी आजपासून एक खास पान ‘लोकमत’मध्ये सुरू होतं आहे : ‘ग्रीन किड्स’, ‘पर्यावरण’ हा गुळगुळीत झालेला शब्द आणि शाळकरी अभ्यासातलं त्याचं कंटाळवाणं, रटाळ रूप ओलांडून गप्पा-गोष्टी, प्रयोग आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या वाटांनी तुमच्या मुलांना घेऊन जाणारा हा प्रयत्न तीन महिन्यांहून अधिक काळ चालेल. मुलांच्या जिज्ञासेला खतपाणी घालायला उत्सुक असलेले आईबाबा, नातवंडांच्या ‘दुपारच्या उद्योगा’त त्यांचे सवंगडी असलेले आजी-आजोबा आणि पुस्तकांच्या पलीकडचा अनुभव आपल्या विद्याथ्र्यानी घ्यावा, यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक/शाळा या सर्वानाच ‘ग्रीन किड्स’मध्ये सहभागासाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत. (लोकमत : ग्रीन टीम)
 
या छोटय़ा मित्रंना घरात कुणाचा ओरडा बसू नये, म्हणून एक छोटी सूचना : ग्रीन किड्सचं पान कापून ठेवण्याआधी घरातल्या सगळ्यांचा पेपर वाचून झालाय ना, हे एकदा विचारून घ्या, काय!!
 
च्घरी व शाळेत करता येतील अशा धमाल प्रयोगांची माहिती
च् मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळवून देण्याची खास व्यवस्था
च् शाळांना आपल्या ‘हिरव्या प्रयोगां’सह सहभागाची संधी
च्रोजचा अंक न चुकता वाचणा:या आणि संग्रही ठेवणा:या मुलांसाठी विमान सफरीसह मस्त बक्षिसांची लयलूट