शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रेत आज दीड हजार सौरचुलींवर शिजणार मॅगी

By admin | Updated: January 15, 2015 05:24 IST

बच्चेकंपनीपासून मोठ्यांची आवडती ‘दो मिनिट’वाली मॅगी उद्या सौरचुलीवर शिजवली जाणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त वांद्रे येथील

मुंबई : बच्चेकंपनीपासून मोठ्यांची आवडती ‘दो मिनिट’वाली मॅगी उद्या सौरचुलीवर शिजवली जाणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त वांद्रे येथील पटवर्धन मैदानावर तब्बल पंधराशे मुले सौरऊर्जेवर मॅगी बनविण्याचा प्रयोग करणार आहेत. केशवसृष्टी आणि वांद्रे हिंदू असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ऊर्जा बचत आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार आदी नेते उपस्थित राहणार आहेत. तब्बल १५०० बच्चेकंपनी एकत्र येऊन उद्या पटवर्धन गार्डनमध्ये सौरऊर्जेच्या किटवर मॅगी शिजवण्याचा आनंद लुटणार आहेत. वांद्रे पश्चिमेला नॅशनल कॉलेजसमोरील पटवर्धन गार्डनमध्ये स. ९ वाजता १५०० शालेय विद्याथी एकाचवेळी सौरऊर्जेवर चालणाऱ्या किटवर स्वत:च मॅगी शिजवणार आहेत. यात शंभर विद्यार्थी महापालिका शाळांमधील असून ५० अपंग विद्यार्थीही असतील. प्रत्येक विद्यार्थ्याला सोलार किट देण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात ते घरी नेण्याची सोय असून दीडशे विद्यार्थ्यांना हा किट मोफत दिला जाईल. (प्रतिनिधी)