शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘माफसू’ला मिळणार नवे शास्त्रज्ञ!

By admin | Updated: July 19, 2014 01:31 IST

भरती घोटाळ्य़ानंतर प्रथमच होत आहे नोकरभरती

अकोला : संपूर्ण राज्यात गाजलेल्या भरती घोटाळ्य़ाच्या पार्श्‍वभूमीवर, तब्बल आठ वर्षांपासून कर्मचारी भरती बंद असलेल्या महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू)ला, अखेर कर्मचारी भरतीची परवानगी मिळाली असून, लवकरच विद्यापीठाला १५४ नवे शास्त्रज्ञ व अधिकारी मिळणार आहेत.पशू, प्राण्यांशी निगडित विषयांवर संशोधन व सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी, दहा वर्षांपूर्वी राज्यात ह्यमाफसूह्ण हे स्वतंत्र विद्यापीठ नागपूर येथे स्थापन करण्यात आले. या विद्यापीठामुळे नवे संशोधन करण्याच्या संधी शास्त्रज्ञांना मिळाल्या. या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, स्टेम सेल्स, रोगमुक्त जनावरे, तसेच नेमक्या आजारावर उपचार करणारी औषधी, इत्यादी विषयांमध्ये केलेली संशोधने मैलाचा दगड ठरली आहेत; मात्र विद्यापीठात २00८ मध्ये झालेल्या नोकरभरती घोटाळ्य़ामुळे विद्यापीठाची प्रतिमा चांगलीच मलीन झाली होती. जवळपास ४५0 पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याने, शासनाने चौकशी समितीच्या अहवालानंतर त्या सर्व पदांवर झालेली भरती रद्द केली होती.विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. अरू ण निनावे यांच्यावर सदर घोटाळाप्रकरणी निलंबित होण्याची पाळी आली होती; तथापि उच्चस्तरीय चौकशीनंतर डॉ. निनावे यांचे निलंबन रद्द करण्यात आले होते. दरम्यान, या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. आदित्यकुमार मिश्र यांनी हाती घेतल्यानंतर, नोकरभरती घोटाळ्यामध्ये दोष नसलेल्या काही शास्त्रज्ञ व अधिकार्‍यांना कामावर रू जू करू न घेण्यात आले होते. या प्रकरणामुळे पदोन्नती रखडलेल्या अनेकांना पदोन्नतीही देण्यात आली आहे.या राज्यस्तरीय विद्यापीठाला लागणारे पुरेपूर मनुष्यबळ विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्यामुळे, संशोधनासह विद्यापीठाच्या इतरही कामकाजावर प्रतिकुल परिणाम होत होता. विद्यापीठाला सुमारे १,५00 शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचार्‍यांची गरज असताना, प्रत्यक्षात पाचशेपेक्षा कमी कर्मचारी सद्य स्थितीत कार्यरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, विद्यापीठाने नव्या पदांची मागणी सातत्याने रेटून धरली होती. ती अखेर मान्य झाली असून, शासनाने १५४ शास्त्रज्ञ भरतीची अनुमती विद्यापीठाला दिली आहे. भरतीची अनुमती मिळालेल्या पदांपैकी १00 पदे साहाय्यक प्राध्यपकांची असून, उर्वरित पदांमध्ये सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यपक या पदांचा समावेश आहे. विद्यापीठाला मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. शासनाने नवीन पदांच्या भरतीसाठी अनुमती दिली आहे. आम्ही १५४ पदे भरणार आहोत. त्यामुळे विद्यापीठाच्या कामाकाजाला गती मिळणार असल्याची माहीती महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संपत खिल्लारी यांनी दिली.