शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मद्रास बटालियन विजेता

By admin | Updated: March 11, 2017 00:13 IST

सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल : १०८ टीए महार संघावर ३-१ ने मात

कोल्हापूर : सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात १२२ इन्फंट्री बटालियन मद्रास संघाने १०८ इन्फंट्री बटालियन महार (एमपी) संघावर ३-१ अशी मात करीत विजेतेपद पटकावले. मद्रास संघाचा महंमद सुहेल चाहील हा उत्कृष्ट खेळाडू ठरला. शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी सकाळी १२२ टीएम मद्रास व १०८ टीए महार या दोन संघांत अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांकडून वेगवान चाली खेळण्यात आल्या. ‘मद्रास’कडून फैजल, श्रीजित, चिको, महंमद सुहेल यांनी, तर महार संघाकडून विक्रम, गयासुद्दीन, प्रशांत, कीर्ती टी. यांनी उत्कृष्ट खेळ करीत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली. पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळाचे प्रदर्शन झाले. मात्र, एकाही संघाला आघाडी घेता आली नाही. उत्तरार्धात ४५ व्या मिनिटाला १०८ टीएम महार संघाच्या अर्जुनने गोल करीत संघाचे खाते उघडले. यानंतर मात्र, मद्रास संघाच्या शिबीन याने ५० व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल नोंदवित सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर मद्रास संघाकडून संपूर्ण सामन्यावर शेवटपर्यंत वर्चस्व राहिले. मद्रासकडून ७५ व्या मिनिटाला अब्दुल रहिमानने, तर ७८ व्या मिनिटाला सुमेंशकडून गोल नोंदविण्यात आले. त्यामुळे सामन्यात ३-१ अशी मद्रास संघाची भक्कम स्थिती झाली. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम राखत मद्रास संघाने सामन्याबरोबर चषकावर नाव कोरले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सदर्न कमांड हेडक्वार्टरचे डेप्युटी कमांडर कर्नल नवीन शर्मा, १०९ टीए मराठा बटालियनचे कमांडिंग कर्नल आर. एस. लेहल (सेना मेडल) यांच्या हस्ते झाले. यावेळी मेजर नवीन पवार, लेफ्टनंट कर्नल संदीप भटनागर, लेफ्टनंट लियान वायफाय, सुभेदार उत्तम नाईक, शिवाजी पाटील, केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चाहील सर्वोत्कृष्ट खेळाडूस्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून १२२ मद्रास संघाचा महंमद सुहेल चाहील याला चषक देऊन गौरविण्यात आले. त्याने स्पर्धेत सर्वाधिक १० गोलची नोंद केली; तर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून १५४ टीए बिहार संघाचा सॅम्युएल यास गौरविण्यात आले. जाफरची हॅट्ट्रिकअंतिम सामन्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी ११० टीए मद्र्रास विरुद्ध १५४ टी. ए. बिहार यांच्यात सामना झाला. तो मद्रास संघाने ५-० असा दणदणीत जिंकत तिसरा क्रमांक पटकाविला. या सामन्यात मद्रासच्या जाफरने हॅट्ट्रिकसह चार गोलची नोंद केली. हे गोल त्याने ४८, ८५, ८६, ९१ या मिनिटाला केले. उस्मानने ७४ मिनिटाला एक गोल केला. ५कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या १२२ इन्फंट्री बटालियन मद्रास संघास विजेतेपदाचा चषक कर्नल नवीन शर्मा, कर्नल आर. एस. लेहल (सेना मेडल) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मेजर नवीन पवार, लेफ्टनंट कर्नल संदीप भटनागर, लेफ्टनंट लियान वायफाय, सुभेदार उत्तम नाईक, शिवाजी पाटील, के. एस .ए.चे पदाधिकारी माणिक मंडलिक, आदी उपस्थित होते.