ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठीचा राग आळवत राडा केला असून घाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण केली आहे. मनसेच्या ४ ते ५ कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याला बेदम मारहाण करत त्याच्या गाडीवरची फळही फेकून दिली. घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
या भागात परप्रांतियांनी रस्त्यावर दुकाने थाटू आणि संबंधित फळवाल्याने दुस-या एका मराठी व्यक्तीला गाडी लावण्यापासून आडकाठी केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत त्याला मारहाण केल्याचे समजते.
दरम्यान ' ही मारहाण नसून हे एक आंदोलन असून उत्तर भारतीयांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर दिलं आहे' असं मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच ' शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यास आडकाठी करणाऱ्या परप्रांतीयांना असंच उत्तर देऊ' असे ते म्हणाले.
#WATCH Mumbai (7.9.16): Hooliganism by MNS workers in Ghatkopar area, fruit vendor thrased (source: unverified) pic.twitter.com/iJ6wbpKIRc— ANI (@ANI_news) September 8, 2016