शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

लुसी पोहचली अमेरिकेत, कौन्सीलेटकडून पोलिसाची प्रशंसा

By admin | Updated: July 27, 2016 02:30 IST

पर्यटनाला आलेली एक विदेशी तरुणी ग्रामीण परिसरात उतरते. सोबत दुसरे कुणीही नसल्याने आणि भाषेची अडचण असल्याने ती गोंधळते. तशात तिची प्रकृती बिघडल्याने कावरीबावरी

नागपूर : पर्यटनाला आलेली एक विदेशी तरुणी ग्रामीण परिसरात उतरते. सोबत दुसरे कुणीही नसल्याने आणि भाषेची अडचण असल्याने ती गोंधळते. तशात तिची प्रकृती बिघडल्याने कावरीबावरी झालेल्या या तरुणीभोवती सडकछाप मजनू गोळा होतात. प्रकरण भलत्याच वळणावर जाण्याचे संकेत असतानाच एक सदगृहस्थ पोलिसांना कळवितो. लगेच पोलीस पोहचतात. तरुणीला पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर प्रथमोपचार करून तिची वास्तपूस्त केली जाते. दिलासा मिळाल्यामुळे तिही सावरते. नाव, गाव, पत्ता, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक कळविला जातो. पोलीस लगेच अमेरिकेन दुतावासाच्या माध्यमातून तिच्या आईशी संपर्क करतात. तिची आई नागपुरात येईपावेतो तिला एका हॉटेलमध्ये ठेवले जाते. आई येते, तरुणीला पोलीस तिच्या आईच्या हवाली करतात. मायलेकी पोलिसांचे आभार मानत अमेरिकेत निघून जातात. एका प्रकरणाचा सुखद शेवट होतो. हा प्रकार म्हणजे कुण्या चित्रपटातील प्रसंग नव्हे. ही रियल स्टोरी आहे. दीड महिन्यापूर्वी कळमन्यात घडलेली!
 
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी लुसी चेन (वय २२) ही तरुणी जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दीड महिन्याच्या पर्यटनाला आली. दिल्लीहून ती बेंगरुळू येथे गेली. तेथील हॉटेलमध्ये काही दिवस मुक्काम केल्यानंतर विपश्यनेसाठी ती रायपूरला (छत्तीसगड) येथे गेली. पासपोर्ट, व्हीजासह महत्वाचे कागदपत्रे आपण बेंगरूळू येथेच राहून गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे रायपूरहून ती नागपूर मार्गे पुन्हा बेंगरुळूला जायला निघाली. बसने येताना चुकून ती पारडीत (नागपूर समजून) उतरली. बराच वेळ ईकडे तिकडे फिरल्यानंतर आपण हरविल्याचे (वाट चुकल्याचे) तिच्या लक्षात आले. पारडीच्या ग्रामीण भागाचे वातावरणही तिची प्रकृती बिघडवणारे ठरले. कावरीबावरी झालेल्या लुसीला पाहून काही सडकछाप मजनू तिच्या अवतीभवती घुटमळू लागले. भाषेची मुख्य अडचण असल्याने लुसी चांगलीच गोंधळली. तिची ही अवस्था पाहून एका सदगृहस्थाने कळमना पोलिसांना फोन केला. सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी आणि प्रिती यादव नामक कर्मचा-यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन लुसीला ठाण्यात आणले. ठाणेदार सुनील बोंडे यांनी तिची वास्तपुस्त केली. तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यामुळे लुसीला हिम्मत मिळाली. तिने आपले नाव, गाव, पत्ता सांगून आईचा मोबाईल क्रमांकही कळविला. बोंडे यांनी लगेच ही माहिती वरिष्ठांच्या माध्यमातून अमेरिकन दुतावासातर्फे लुसीच्या आईला कळविली. लुसीची आई लॉस एंजेलिसवरून लगेच दिल्लीत आणि नंतर नागपुरात कळमना ठाण्यात पोहचली. तोपर्यंत लुसीचा मुक्काम कळमना मार्केटजवळच्या एका हॉटेलात होता. लुसीला पाहताच तिची आई तिला घट्ट बिलगली. लुसीने रडतच आपली प्रवास यात्रा आणि कळमना पोलिसांचा सौजन्यपूर्ण व्यवहार आईला सांगितला. कळमना पोलिसांनी नंतर या दोन मायलेकींना बेंगरुळू येथे हरविलेले लुसीचे कागदपत्र मिळवून देण्यासही मदत केली. पोलिसांचे आभार व्यक्त करत अमेरिकन मायलेकी १८ जूनला आपल्या देशात परतल्या.
 
 
कौन्सिलेट जनरलने घेतली दखल
लुसी अमेरिकन उद्योजकांच्या परिवारातील आहे. तिच्या आईने हा प्रकार अमेरिकन दुतावासाला सांगून कळमना पोलिसांच्या आदरातिथ्याची माहिती कळविली. त्याची दखल घेत कौन्सिलेट जनरल आॅफ द युनायटेड स्टेटस् आॅफ अमेरिकाचे कौन्सिल जनरल थॉमस वाज्डा यांनी २० जून रोजी कळमना पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. दोन दिवसांपूर्वी हे पत्र पोलिसांना प्राप्त झाले. त्यात अमेरिकन कौन्सिलने शहर पोलिसांच्या कार्यशैलीची प्रशंसा करून त्यांचे आभारही मानले आहे.