शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या नियोजनाचा ‘एलटीटी-मडगाव’ला फटका

By admin | Updated: January 10, 2016 01:31 IST

लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबलडेकरला मरेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसला आहे. या गाडीच्या वेळेदरम्यान दोन तासांच्या अंतराने कोकणात जाण्यासाठी

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबलडेकरला मरेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसला आहे. या गाडीच्या वेळेदरम्यान दोन तासांच्या अंतराने कोकणात जाण्यासाठी तब्बल तीन गाड्या उपलब्ध आहेत. आणि ही गाडी एलटीटीहून सुटत असल्याने गेल्या १४ फेऱ्यांमध्ये केवळ ८ वेळा ती ५० टक्क्यांहून अधिक भरली आहे. तर उर्वरित काळात या गाडीला ३० टक्केही प्रतिसाद मिळालेला नाही.ही गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना ५ वाजता एलटीटी गाठावे लागत आहे. हा परिसर निर्मनुष्य असून येथे गुन्हे घडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवासी एलटीटीच्या वाट्याला जात नाहीत. मडगाव गाडीच्या पाच मिनिटे आधी दादरहून मडगावला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मडगावला पोहोचते. तर एलटीटीहून सुटणारी वातानुकूलित डबलडेकर गाडी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मडगावमध्ये दाखल होते. दुसरीकडे पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास दिवा-सावंतवाडी, ७ वाजता सीएसटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस अशा दोन गाड्यांचा पर्याय प्रवाशांसमोर खुला आहे. परिणामी, एलटीटीहून सुटणाऱ्या मडगाव गाडीची वेळ बदलण्यात यावी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)