शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची अल्प भाडेवाढ

By admin | Updated: May 20, 2014 03:46 IST

एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक भार पडला असल्याने महामंडळाने यातून बाहेर पडण्यासाठी २.५० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

मुंबई : एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक भार पडला असल्याने महामंडळाने यातून बाहेर पडण्यासाठी २.५० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. ही भाडेवाढ अल्प म्हणजे प्रति कि.मी. मागे २.५ पैसे इतकी असल्याचे सांगितले जाते. मात्र राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर ही भाडेवाढ होणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. डिझेलच्या दरात नुकतीच १ रुपये ९ पैसे दरवाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत ६५ रुपये २१ पैसे तर तर ठाण्यात डिझेल ६५ रुपये १५ पैसे झाले. राज्यातील इतर ठिकाणीही डिझेलची किंमत एवढीच आहे. सध्या प्रत्येक दिवशी एसटी महामंडळाला ११ ते १३ लाख लिटर डिझेल लागते. यामुळे महामंडळावर २०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक बोजा पडतो. डिझेलचे दर वाढल्याने यात महिन्याला आणखी चार कोटींचा बोजा पडणार आहे. हे पाहता महामंडळाने २.५० टक्के डिझेल दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार ही भाडेवाढ अल्प असणार असून, त्यामुळे प्रवाशांवर कुठलाही मोठा भार पडणार नसल्याचा दावा एसटीतील अधिकार्‍यांकडून केला जात आहे. भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला वर्षाला तब्बल १०० कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव लवकरच राज्य परिवहन प्राधिकरणाकडे जाणार असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच तो लागू केला जाईल, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)