शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलास मारहाण करणारे अटकेत

By admin | Updated: January 17, 2015 05:27 IST

व्हॉट्स्अ‍ॅपवर युगुलाला मारहाण केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ लातूरच्याच मुला-मुलीचा असल्याचे गुरुवारी रात्री उशिरा समोर आले.

लातूर : व्हॉटस्अ‍ॅपवर युगुलाला मारहाण केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ लातूरच्याच मुला-मुलीचा असल्याचे गुरुवारी रात्री उशिरा समोर आले. यानंतर रात्रभर स्पॉटपाहणी करणाऱ्या पोलिसांनी पहाटे ४ वाजता मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी ‘गनिमी कावा’ या संघटनेच्या सहा जणांवर मुरुड पोलिसांत गुन्हा नोंद केला. गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाने तातडीने कोम्बींग आॅपरेशन करून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमोल खंदाडे (१९), संदीप गोडसे (१९), नितीन गोडसे (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर म्होरक्या बालाजी गोडसे, राकेश गोडसे आणि अक्षय बनसोडे हे फरार आहेत. लातुरातील एक युगूल ३० नोव्हेंबर २०१४ रोजी सायंकाळी विमानतळाजवळ साखरापाटीच्या रस्त्यावरून दुचाकीने जात होते. त्याचवेळी जवळील हॉटेलमध्ये बसलेल्या गनिमी कावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कारने पाठलाग केला. कारमधील सहा जणांनी रस्त्यावर या युगुलाला अडवून जबर मारहाण केली. याचे मोबाइलवर चित्रीकरण केले़ ही चित्रफीत एक महिन्यापासून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर व्हायरल झाली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनेही हा व्हिडीओ प्रसारित केला. गृहराज्यमंत्र्यांनी गुरुवारी या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले. यानंतर तपासचक्रे हलली आणि हा व्हिडीओ लातूरच्या युगुलाचा असल्याचा संशय आला. गुरुवारी रात्री पीडित तरुणाने पुढे येत पोलीस ठाणे गाठले. लातूर शहर, मुरुड आणि गातेगाव या तीनही ठाण्यांच्या पोलिसांनी मध्यरात्री स्पॉट पाहणी करून हे प्रकरण मुरुड पोलिसांच्या हद्दीतील असल्याने पहाटे गुन्हा नोंद केला. (प्रतिनिधी)