शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह अथवा अरेंज मॅरेजचे घटस्फोटाला नाही वावडे

By admin | Updated: February 12, 2016 03:35 IST

जोडप्यांचे घटस्फोट होण्यामध्ये ‘लव्ह मॅरेज’ किंवा ‘अरेंज मॅरेज’असा कोणताही भेद आता उरलेला नाही. याउलट तंत्रज्ञान तसेच कम्युनिकेशनच्या वाढलेल्या विविध साधनांमुळे जोडप्यांमधील

पुणे : जोडप्यांचे घटस्फोट होण्यामध्ये ‘लव्ह मॅरेज’ किंवा ‘अरेंज मॅरेज’असा कोणताही भेद आता उरलेला नाही. याउलट तंत्रज्ञान तसेच कम्युनिकेशनच्या वाढलेल्या विविध साधनांमुळे जोडप्यांमधील संवाद कमी झाला असून, दुरावा वाढण्याचे व घटस्फोटापर्यंत जाण्याचे हे मुख्य कारण असल्याचे मत कौटुंबिक खटल्यांमध्ये काम करणाऱ्या विधिज्ञांनी व्यक्त केले. मुळात, अद्यापही आपल्या समाजात, अरेंज मॅरेज करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने घटस्फोटाच्या प्रमाणाची तुलना करणे अवघड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.काही वर्षांपूर्वी महिलांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयीची जाण नव्हती. जाणीव झाल्यानंतरही कायद्याबाबत अनभिज्ञता होती. त्यामुळे बहुतांश वेळा अरेंज मॅरेजमधील स्त्रिया तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होत्या. तसेच, अनेकदा लव्ह मॅरेजमध्येच घटस्फोट घडतात, अशी धारणाही प्रचलित झालेली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र वेगळेच झाले असून, घटस्फोटामध्ये लव्ह मॅरेजमधील असमंजसपणा हे कारण हळूहळू कमी झाल्याचे दिसत आहे. या उलट अरेंज किंवा लव्ह मॅरेज असे वावडे घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांना नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. स्त्रिया सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने आपल्यावर अन्याय होत असल्यास त्याविरोधात पाऊल उचलण्याचे धैर्य त्यांच्यात दिसत आहे. त्याचबरोबर वाढत्या कम्युनिकेशनच्या जमान्यात जोडप्यांतील हरवलेला संवाद, अवास्तव अपेक्षा आणि नव्याने समोर येत असणारे ‘एक्स्टा मॅरेटल अफेअर’ ही कारणे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे फक्त लव्ह मॅरेजमध्येच घटस्फोटाचे प्रमाण आहे किंवा अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये असा भेदाभेद उरला नसल्याचे कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.लव्ह व अरेंज अशा दोन्ही प्रकारची जोडपी घटस्फोटासाठी अर्ज करीत आहेत. आमच्याकडील खटल्यांचा विचार केला, तर अरेंज मॅरेजमधील जोडपी अधिक दिसत आहेत. मात्र, लग्नाचा कोणताही प्रकार असला, तरी त्यांची कारणे सारखीच असतात. दोघांमध्ये समजून घेण्याची वृत्ती तपासण्याची सोय आपल्याकडे नाही. स्थळ दाखवताना मांडलेले मुद्दे आणि वास्तव यात फरक असतो. मतभेद, अपेक्षाभंग हेही कारणे असताताच. तसेच आता नव्याने ‘एक्स्ट्रा मॅरेटल’ अफेअर हेही घडत आहे. - अ‍ॅड. रमा सरोदे लव्ह मॅरेजमध्ये असणारा उथळपणा यामुळेही घटस्फोटाचे त्यात प्रमाण अधिक आहे. अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबीयांची संमती असते. त्यामुळे पती-पत्नी सहजासहजी घटस्फोटासाठी राजी होत नाहीत. मात्र, लव्ह मॅरेज करताना आणि मोडताना अशा दोन्ही वेळेस मुले आपल्या कुटुंबीयांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.- अ‍ॅड. अफरोज शेख पूर्वीसारखे लव्ह मॅरेजमुळे घटस्फोट हा विषय आता तितका ज्वलंत राहिला नाही. आताही काही वेळा असे घडते, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. या उलट आता अरेंज किंवा लव्ह मॅरेज असले, तरी पती-पत्नी दोघे नोकरी करत असतात. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. सोशल माध्यमांचा अतिवापर वाढला आहे, याचा परिणाम नात्यांवर होताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या नात्यांमध्ये घटस्फोटाची ही कारणे दिसत आहेत.- अ‍ॅड. भारती जागडे दोन्ही प्रकारच्या लग्नांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण दिसत आहे. पूर्वी स्त्रियांना कायद्याची जाण नव्हती, मात्र आता मोठ्याप्रमाणात कायद्यांची माहिती झाली; तसेच आर्थिक स्वावलंबनही वाढले आहे. पूर्वी कुटुंबाकडून शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थैर्याची अपेक्षा असे. मात्र आता यासाठी लग्न करण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारा आणि तसे जगू पाहणारा वर्ग निर्माण होऊ लागला आहे.- अ‍ॅड. सुप्रिया कोठारी