शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पुण्यात कमळ फुलले

By admin | Updated: February 24, 2017 05:07 IST

पुणे महापालिकेमध्ये कमळ फुलले असून, भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमत मिळविले

पुणे : पुणे महापालिकेमध्ये कमळ फुलले असून, भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला असून, कॉँग्रेसची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट झाली आहे. गेल्या वेळी महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोळ्यासारखा उडून गेला आहे. मनसेला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते व सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे, भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उपमहापौर मुकारी अलगुडे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्यासह १५ विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. महापौर प्रशांत जगताप, काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले, सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयश्री संपादन केली. काँग्रेसचे अरविंद शिंदे, रिपाइंचे सिद्धार्थ धेंडे वगळता सर्व पक्षांचे गटनेते पराभूत झाले. मतदारांनी केवळ ‘कमळ’ चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे जनता वसाहत प्रभागातून भाजपाने आरपीआयच्या उमेदवार सत्यभामा साठे यांना पुरस्कृत करूनही एबी फॉर्मच्या गफलतीत भाजपा उमेदवार सरस्वती शेडगे निवडून आल्या. इतर पक्षातून भाजपात आलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयश्री मिळाली आहे. रेश्मा भोसले, प्रकाश ढोरे आदींचा यामध्ये समावेश आहे. पुणेपक्षजागाभाजपा९८शिवसेना१०काँग्रेस११राष्ट्रवादी४०इतर३