उल्हासनगर : महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांतर केलेले तब्बल २१ जण नगरसेवकपदी निवडून आले आहेत. यात साई पक्षाचे ७ , भाजपा व ओमी टीमचे ९ तर शिवसेनेतील ५ आयारामांचा समावेश आहे. यातील काही नगरसेवक प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलण्यात पटाईत आहेत.ओमी कलानी यांच्या टीममधील राजेश वधारिया, आशा बिऱ्हाडे, जयश्री पाटील सविता रगडे-तोरणे, कविता गायकवाड,मीना सोंडे, विजय पाटील, मिनाक्षी पाटील आणि किशोर वनवारी हे आयाराम सभागृहात पोहचले. साई पक्षातील अजित गुप्ता, दिप्ती दुधानी, कंचन लुंड, ज्योती चैनानी, शंकर लुंड, गजानन शेळके, कविता पंजाबी हे बाहेरुन आलेले नगरसेवक झाले. तसेच शिवसेनेतील स्वप्नील बागुल, पुष्पा बागुल अंकुश म्हस्के, शुभांगी बहेनवाल, सुनील सुर्वे हे आयाराम सभागृहात दाखल झाले. सेनेचे स्वप्निल बागुल सर्वात तरूण नगरसेवक आहेत. (प्रतिनिधी)
लॉटरी लागली २१ आयारामांना
By admin | Updated: February 27, 2017 03:36 IST