शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

हरवलेले आजोबा सुखरूप घरी परतले

By admin | Updated: March 3, 2016 04:19 IST

मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या धर्मराज रामलिंग देशमुख या ज्येष्ठ नागरिकाला बीडमधील त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी दीपक गोरेवार या मुंबईकराने केली आहे.

मुंबई : मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या धर्मराज रामलिंग देशमुख या ज्येष्ठ नागरिकाला बीडमधील त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी दीपक गोरेवार या मुंबईकराने केली आहे.२० फेब्रुवारी रोजी नोकरीवर जाताना दीपक यांना चेंबूरमधील विष्णूनगर येथे एक वयस्कर गृहस्थ अस्वस्थ असल्याचे दिसले. त्यांच्याविषयी काळजी निर्माण झाल्यानंतर त्याने चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून नावशिवाय त्यांना काहीच मिळत नव्हती. त्यामुळे केवळ नावावरच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे दीपकने ठरवले. त्यानंतर तो त्यांच्याशी दररोज संवाद साधू लागला. संवादावेळी आपल्या आणि त्यांच्या भाषेत दीपकला साधर्म्य आढळले. शिवाय त्यांच्याकडून काही गावांची माहिती मिळू लागली. यावरून दीपकने अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाबद्दल विचारणा केली. अखेरीस त्यांनी ‘माकेगाव’ असा शब्द उच्चारल्यानंतर त्याविषयी शोध घेण्यात आला. बीड जिल्ह्यात आंबेजोगाई तालुक्यात हे गाव असल्याचे समजल्यावर तेथील कृषी समितीशी संपर्क साधण्यात आला. शिवाय तेथील पोलिसांशी संपर्क साधत त्यांनी देशमुख यांची चौकशी करत पत्ता मिळवला. आणि तब्बल ८ महिन्यांपासून मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या या ज्येष्ठ नागरिकास त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.मुंबईच्या गर्दीत अनेक माणसे भरकटलेली आढळतात. त्यांचे मानसिक संतुलनही बिघडलेले असते. अशांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचा प्रयत्न सगळ््यांनी करायला पाहिजे.- दीपक गोरेवारपंढरपूर यात्रेसाठी गेलेले सासरे घरी परतलेच नाही. त्यांच्या हरवण्याची तक्रार पोलीसांत केली होती. ८ महिन्यांपूर्वी हरवलेले सासरे परत येतील, अशी अपेक्षा होती. दीपक गोरेवार यांच्या मेहनतीमुळे सासरे सुखरुप परतले.- प्रियंका देशमुख,धर्मराज देशमुख यांची सून