शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेला खो; ५00 शहरांचे होणार सर्वेक्षण

By admin | Updated: August 13, 2016 00:32 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची धावपळ सुरू.

आशिष गावंडेअकोला, दि. १२ : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निवड करण्यात आलेल्या ५00 शहरांना स्वच्छतेसाठी केंद्र शासनाने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही साफसफाईची समस्या कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेला ह्यखोह्ण दिल्याचे ध्यानात घेता संबंधित शहरांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याविषयाची माहिती घेण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री व्यंकैया नायडू सरसावल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची धावपळ सुरू झाली आहे.शहरात ठिकठिकाणी तुंबणारी घाण, कचर्‍याचे ढीग यामुळे नागरिक ांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पावसाच्या दिवसांत अस्वच्छतेच्या समस्येत कमालीची वाढ होत असल्यामुळे साथ रोगांचा झपाट्याने फैलाव होतो. उघड्यावर शौच करण्याच्या प्रकारामुळे जीवघेण्या जंतूचा प्रादुर्भाव वाढतो. या समस्येला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ५00 शहरांची निवड केली. कचर्‍याच्या समस्येपासून मुक्ती देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. अभियानाच्या निकषानुसार स्वराज्य संस्थांनी कचरा गोळा करण्यापासून ते विल्हेवाट लावण्यापर्यंत विविध टप्पे ठरवून दिले आहेत. पहिल्या टप्प्यात घरी शौचालय नसणार्‍या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक शौचालय उभारून देण्याचे निर्देश आहेत. यासाठी येत्या २ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर घरातून निघणारा कचरा जमा करणे, त्यातही ओला-सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याची ह्यडम्पिंग ग्राउंडह्णवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. स्वच्छतेच्या मुद्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची संथ गती पाहता आता संबंधित शहरांमधील स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षणस्वच्छ भारत अभियान अंतर्गत निवड केलेल्या शहरांचे ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी याकालावधीत सर्वेक्षण केले जाईल. स्वच्छतेच्या मुद्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेले काम पाहून त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत गुण दिले जातील. धावपळ सुरू झालीघरा-घरातून निघणारा कचरा, उघड्यावर साचणारा कचरा जमा करून त्यांची ह्यडम्पिंग ग्राउंडह्णवर साठवणूक करणे व विल्हेवाट लावण्यासाठी निधीची कमतरता, राजकारण्यांचा हस्तक्षेप आदी कारणे स्वराज्य संस्थांकडून दिली जात होती. केंद्राने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर मात्र काही स्वराज्य संस्थांची कोंडी झाली. शहराचे सर्वेक्षण होणार, या धास्तीने महापालिकांनी स्वच्छतेसाठी धावपळ सुरू केली आहे.