शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:04 IST

जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे.

हिंगणघाट (वर्धा) : जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे. अशा परिस्थितीत भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. रविवारी हिंगणघाट येथे आयोजित धर्मसंमेलनात ते बोलत होते.

हिंगणघाटनजिकच्या वालधूर येथे पार्श्व पद्मावती मंदिराचे निर्माण सौभाग्यमलजी डागा परिवाराकडून करण्यात आले आहे. येथे पार्श्व पद्मावती देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त येथील जैन मंदिरात धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विजय दर्डा, आमदार समीर कुणावार, राजेंद्रकुमार डागा, डॉ. विनोद बोरा, राजेंद्र चोरडिया, अतुल कोटेचा, रितेश कोचर व मुनीराज आगमनरत्नसागरजी म.सा., मुनीराज प्रशमरत्नसागरजी म.सा., वज्ररत्नसागरजी म.सा., सुरेखाश्रीजी म.सा., चारित्ररसाश्रीजी म.सा., नवपूर्वरसाश्रीजी म.सा., श्रियमरसाश्रीजी म.सा., प्रियमरसाश्रीजी म.सा. आदी उपस्थित होते. यावेळी विजय दर्डा यांचा अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ व माळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शन करताना विजय दर्डा म्हणाले की, जैन साधू संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून ‘जीवन जीने की कला’ शिकविण्यासोबतच पर्यावरण, हिंसाचार, अपरिणय याबाबतही संदेश समाजाला देण्याची गरज आहे. गरिबीच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी ‘जिओ जिने दो’ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आई ही सर्वात मोठी शिक्षक असते, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कटारिया यांनी केले. धर्मसंमेलनापूर्वी शहरातून वरघोडा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील जैन मुनींचे दर्शन विजय दर्डा यांनी घेतले. या शोभायात्रेत जैन समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जैन समाजातील सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना एकत्रित बांधण्याचे काम तरुणांनी करण्याची गरज आहे. नागपूर येथील यापूर्वी साध्वी प्रीतीसुधाजी यांच्या उपस्थितीत विविध पंथांतील संताना एकत्रित आणण्यात आले होते. हे काम तरुणांनी पुढे न्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले.